केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा 4 ते 7 एप्रिल जळगाव जिल्हा दौरा
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा 4 ते 7 एप्रिल जळगाव जिल्हा दौरा
लेवाजगत न्यूज जळगाव - केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा दिनांक 04 एप्रिल ते 07 एप्रिल 2025 दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा खालील प्रमाणे
शुक्रवार, दिनांक 04 एप्रिल, 2025 रोजी 09.45 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून मोटारीने मुक्ताईनगरकडे रवाना. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.
शनिवार, दिनांक 05 एप्रिल, 2025 रोजी दुपारी 12.15 वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीने भुसावळकडे प्रयाण दुपारी 12.45 वाजता भुसावळ येथे आगमन. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत भुसावळ येथील डीआरएम कार्यालयात विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत अधिकृत बैठक. दुपारी 2.15 वाजता भुसावळ येथून प्रयाण 02.45 वाजता वरणगाव येथे आगमन. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव येथे महाव्यवस्थापकांसोबत अधिकृत बैठक. संध्याकाळी 04.15 वाजता वरणगाव येथून प्रयाण संध्याकाळी 05 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथे आगमन. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.
रविवार, दिनांक 06 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 10 वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीने जळगावकडे प्रयाण सकाळी 10.30 वाजता जळगाव येथे आगमन. सकाळी 11 ते 03 वाजेपर्यंत जळगाव येथील भाजप कार्यालयात भाजप स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम. दुपारी 03 वाजता जळगाव येथून प्रयाण व 03.00 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन. संध्याकाळी 04 ते संध्याकाळी 06 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील ऑफिसमधील काम. मुक्ताईनगर येथे मुक्काम. सोमवार 07 एप्रिल 2025 रोजी सकाळी 09.45 वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीने जळगाव कडे रवाना. 10 वाजता जळगाव येथे आगमन. सकाळी 10 ते दुपारी 02 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे "धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान" संदर्भात आढावा बैठक. दुपारी 3 वाजता जळगाव येथून मोटारीने मुक्ताईनगर कडे प्रस्थान. दुपारी 3. 30 वाजता मुक्ताईनगर येथे प्रयाण संध्याकाळी 04 ते 06 वाजेपर्यंत मुक्ताईनगर येथील निवासी कॅम्प ऑफिसमधील काम. मुक्ताईनगर येथे रात्रीचा मुक्काम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत