भुज येथील नीलकंठ यात्रा संघाने सावदा श्री स्वामीनारायण मंदिरातील भगवान हरिकृष्ण महाराज यांचे थाळ करिता चांदीचे ताट केले अर्पण
भुज येथील नीलकंठ यात्रा संघाने सावदा श्री स्वामीनारायण मंदिरातील भगवान हरिकृष्ण महाराज यांचे थाळ करिता चांदीचे ताट केले अर्पण
लेवाजगत न्यूज सावदा-येथे आज मंगळवार रोजी श्री स्वामीनारायण मंदिरात दर्शनासाठी कच्च भुज येथून हरिभक्त व सांख्य योगी माताजी सह यात्रेकरू श्री राधाकृष्ण देव-हरिकृष्ण महाराज यांच्या दर्शनासाठी आले होते.
भगवंतांचे दर्शनकरीत असताना आपण भगवानचे काही देणे लागतो ही भावना ह्या हरी भक्तांमध्ये जागृत झाली .त्यांची दानाची परंपरा पूर्वी पासूनच आहे.यावेळी नीलकंठ यात्रा संघ भुज, सौ कांताबाई राजेश भाई पिंडोरिया व हरिभक्त मिळून भगवान श्री स्वामीनारायण, हरीकृष्ण महाराज यांच्या थाळासाठी १लाख ६३हजार रुपयांचे चांदीचे ताट,वाटी,चमचा,आणि ग्लास हे भगवानला अर्पण केले आहे.
यावेळी सावदा मंदिरचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी,शास्त्री स्वामी विश्वप्रकाशदासजी यांनी या हरिभक्तांना आशीर्वाद दिला. कोठारी यांनी सावदा मंदिराचा ११० वर्ष व त्या आधीचा सर्व इतिहास या सर्व हरी भक्तांना सांगितला तर शास्त्री स्वामी विश्वप्रकाशदासजी यांनी परमपूज्य मंजुकेशनंद स्वामी यांचा या कानदेशासाठी दिले गेलेला योगदान व इथला सत्संग त्यांनी वाढवला व त्यावेळेच्या प्रसंगाची सर्व माहित दिली या यात्रेकरूंना सांगितली.
ही यात्रा देवभक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम असून, त्यात भाग घेणाऱ्या यात्रेकरूंनी आपल्या प्रत्येक प्रदेशातून विविध दाने देऊन या मंदिरास आणखी वैभवाने सजवले.
या कार्यक्रमाचे आयोजन नीलकंठ यात्रा संघाच्या वतीने केले गेले, ज्यामध्ये त्यांनी भगवंताच्या पूजनासाठी अत्यंत प्रेम आणि भक्ती दाखवली. "नीलकंठ यात्रा संघाचा हा उपक्रम हा केवळ धार्मिक भक्तीचाच नव्हे, तर समाजातील दानशीलता आणि एकता यांना प्रोत्साहन देणारा आहे," असे एका यात्रेकरूही सांगितले.
नीलकंठ यात्रा ही स्वामीनारायण समुदायाच्या लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण धार्मिक यात्रा असून, त्यात भक्तांची भक्ती आणि पूजनाच्या प्रकारांसाठी प्रसिद्ध आहे.या यात्रेद्वारे विविध प्रदेशातील लोक एकत्र येतात आणि त्यांच्या संस्कृतीचे सामंजस्य प्रस्तुत करतात.हा उपक्रम समाजातील दानशीलता आणि एकतेच्या भावनेला चालना देतो.
नीलकंठ यात्रा संघाचे मुख्य उद्दिष्ट हे धार्मिक भक्ती वाढवणे आणि समुदायातील एकता दृढ करण्यासाठी काम करणे असून, त्यासाठी यात्रेकरू वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या भाविकांना सोबत घेऊन यात्रा करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत