कोचुर खुर्द येथील सरपंच ज्योती कोळी अपात्र
कोचुर खुर्द येथील सरपंच ज्योती कोळी अपात्र
प्रतिनिधी सावदा-कोचूर खुर्द (ता रावेर) येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच ज्योती संतोष कोळी यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र शासनाकडे सादर न केल्यामुळे त्यांना सरपंच पदावरून अपात्र करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे.
कोचूर खुर्द येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी ज्योती संतोष कोळी निवडून आल्या होत्या. मात्र शासनाने निवडणुकीनंतर दिलेल्या मुदतीत सरपंच ज्योती कोळी यांनी वैध जात प्रमाणपत्र कार्यालयाला सादर केले नव्हते. त्यांच्या या ग्रामपंचायत सदस्य लीलाबाई घनशाम तायडे यांनी आक्षेप घेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणीवेळी त्यांनी वैध जात प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे सरपंच ज्योती कोळी यांना लोकनियुक्त सरपंच पदावरून अपात्र करण्याचा आदेश ३० मार्चला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे. लिलाबाई तायडे यांच्याकडून अँड भोसले यांनी कामकाज पाहिले हा आदेश रावेर तहसीलदार व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना पाठवण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत