खामगाव -शेगाव मार्गावरील अपघात: मृतांची संख्या सात? पाच जणांची ओळख पटली
खामगाव -शेगाव मार्गावरील अपघात: मृतांची संख्या सात? पाच जणांची ओळख पटली
लेवाजगत न्यूज बुलढाणा : खामगाव -शेगाव मार्गावरील ब्रह्मांडनायक लॉन्स समोर बुधवारी, २ एप्रिलला झालेल्या अपघातातील पाच मृत आणि जखमीची ओळख पटली आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. एसटी बस, ट्रॅव्हल्स व बोलेरो एकमेकांना धडकले. बोलेरो ( एम एच २८-३३१४ ही शेगाव वरून खामगाव कडे येत असताना , पुणे इथून परतवाडाकडे जाणारी एसटी बसला(क्रमांक एम एच १४ -२३४४) बोलेरो ने धडक दिली, त्यानंतर उभ्या असलेल्या एसटी बसला नाशिक येथून अमरावती येथे जाणारी इंद्राणी ट्रॅव्हल्स (एम एच १५ ४०४१) ला मागून धडक दिली.
सदर अपघातामध्ये बोलेरो मधील धनेश्वर मरावी राहणार मध्य प्रदेश, कृष्णकुमार मोहन सिंह सरोते वय २० वर्ष, शिवपाल, शिवाजी समाधान मुंडे वय ५५ वर्ष राहणार एसबीआय कॉलनी शेगाव व इंद्राणी ट्रॅव्हल्स मधील मेहरुनिसा शेख हबीब वय ४५ वर्ष राहणार धुळे मालेगाव असे चार पुरुष व एक महिला ठार झाले.
जखमीची नावे पुढीलप्रमाणे आहे. शिव धनसिह धुर्वे वय ४७ वर्ष राहणार मध्य प्रदेश कोमल गणेश गंधारे वय ५९ वर्ष राहणार अहमदनगर , वांगे प्रतीक्षा मुकुंदराव वांगे वय २६वर्ष रा. ब्राह्मणवाडा थळी तालुका चांदुर बाजार, अमरावती, सत्यपाल गुलाबराव गवई वय ४० वर्ष रा. लावखेड तालुका पातुर जिल्हा अकोला, सुमन सुखदेवराव भोंडे वय ७० वर्ष रा. अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावती,सुखदेव अमृत भोंडे वय ८१ वर्ष रा. अंजनगाव सुर्जी, दत्ता रामधन मोरखडे वय ४५ वर्ष रा. हिवरखेड रुपराव तालुका तेल्हारा , बापूराव रामकृष्ण सवाने वय ८० वर्ष रा. वझर मेग तालुका निफाड जिल्हा नाशिक, साजिया परवीन शेख हबीब वय १० वर्ष रा. धुळे मालेगाव,शेख हबीब अब्दुल रजाक वय ५० वर्ष रा. धुळे मालेगाव, रंजीत वानखेडे वय ४० वर्ष रा.मूर्तिजापूर, धनराज नागोराव उगले वय ३७वर्ष रा. बेलोरा विमानतळ अमरावती,आशिष सुखदेवराव नवले वय ४० वर्ष रा. अमरावती, प्रल्हाद शिवरामजी आवंडकर वय ७५ वर्ष रा. अंजनगाव सुर्जी अमरावती, वरद चित्रांगण रेवंदले वय ६ वर्ष रा. कुणाला फुरसुंगी बाग पुणे,वंदना देवानंद पांडवकर वय ५१ वर्ष रा. अंजनगाव सुर्जी, पुरुषोत्तम नारायण शिनकर वय ७२ वर्ष रा. करजगाव तालुका चांदुर बाजार, शालिनी पुरुषोत्तम शिनकर वय ६५ वर्ष रा. करजगाव तालुका चांदूरबाजार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत