Header Ads

Header ADS

ग्लोबल खान्देश महोत्सव-२०२५एक सांस्कृतिक महोत्सव...!

 

Global-Khandesh-Mahotsav-2025-a-cultural-festival


ग्लोबल खान्देश महोत्सव-२०२५एक सांस्कृतिक महोत्सव...!

  कल्याण प्रतिनिधी :(सुनील इंगळे)  ग्लोबल खान्देश महोत्सवाचं ऐतिहासिक, उद्यमशील,उद्योगशील व उदयशील कल्याण नगरीत हे १० वं वर्ष...दरवर्षी अडीअडचणी व संकटावर मात करत केवळ आणि केवळ वर्धिष्णू वाटचाल करतोय. यशाची,प्रगतीची व उत्तुंगतेची उंच उंच शिखरे सर करतोय.नवनवीन विक्रमांची नोंद होतेय. ही बाब अत्यंत कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहे. दि. २८ ते ३१ मार्च, २०२५ रोजी दररोज संध्याकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत आत्माराम भोईर चौक,उंबर्डे गांव रोड, सेंट लॉरेन्स हायस्कुल समोर, कल्याण ( प) संपन्न झाला.ग्लोबल खान्देश महोत्सव म्हणजे कल्याणवासियांसाठी थेट ग्रेटभेट...तरुणाईसाठी मनोरंजनाचं,खवैय्यांसाठी खाद्य पदार्थांचं,महिलांसाठी खरेदी विक्रीचं खुलं व्यासपीठच...!


ग्लोबल खान्देश महोत्सव: पहिला दिवस धडाकेबाज,धमाल व दमदार सुरुवात खान्देश ग्लोबल महोत्सवाची.

ग्लोबल खान्देश महोत्सव म्हणजे आनंदाची, उत्साहाची, उल्हासाची पर्वणी... कल्याणकरांसाठी सुंदर मेजवानी... न भुतो न भविष्यती असा सांस्कृतिक महोत्सव...ग्लोबल खान्देश महोत्सव ही अद्वितीय, अद्भुत व अविस्मरणीय योजना होय.कल्याणवासीय लाखो लोकांना अन्नधान्य,कडधान्य, मिरची मसाले, खाद्य संस्कृती यांचं खुलं व्यासपीठ आहे.

 ग्लोबल खान्देश महोत्सव ब्रँडनेम आहे.लोकल टू ग्लोबल पोहचणं ही आपल्या करिश्माई व किमयागारी कार्याची पोचपावती आहे. सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असा महोत्सव हेच यशाचे गमक आहे... दहा वर्षात महोत्सवाने आगळी वेगळी उंची गाठली.खान्देश महोत्सव कधी लोकल टू ग्लोबल महोत्सव सातासमुद्रापार गेला ते कळलं नाही.35 हून अधिक देशातील खान्देशी बांधव रसिक प्रेक्षक म्हणून आनंद व आस्वाद घेतात हीच मोठी झेप आहे...दशकपूर्ती महोत्सवाचं उद्घाटन लोकनेते तथाभारताचे माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री मा.श्री कपिलजी पाटील यांच्या शुभहस्ते हस्ते झाले. उदघाटन पर भाषणात खान्देशी बांधव आणि आगरी बांधव वेगळे नाहीत. ते एकमेकाला पुरक आणि पोषक समर्थन करतात, पाठिंबा देतात. आम्हाला घडविण्यात खान्देशी गुरुजींचा वाटा मोठा आहे. तुमच्यामुळेच मला राजकारणात यशाची शिखरे गाठता आली. खान्देश महोत्सव माझ्यासाठी प्रमुख आकर्षण आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कोकण पदवीधर  मतदार संघांचे लाडके व लोकप्रिय आमदार श्री निरंजनजी डावखरे यांनीही मनोगत व्यक्त करताना उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आणि टीमचे कौतुक आणि अभिनंदन केले. मा आमदार नरेंद्रजी पवार हे खान्देशचे जावई असल्यामुळे खान्देशी पदार्थांची चव मला घरातच चाखायला मिळते. त्यामुळे मी घरी आलेल्या पाहुण्यांसाठी खान्देशी जेवण बनवावं म्हणून आग्रही असतो असं सुतोवाच केलं.मा.नगरसेवक प्रभूनाथ भोईर, मा नगरसेवक वरुण पाटील, मा.नगरसेवक जयवंत भोईर इ मान्यवरांनी आपल्या मनोगतातून तुम्ही कमी तेथे आम्ही या नात्याने मदत करु. हाक द्या,हात द्या. नक्की साथ देऊ... असा आश्वासन दिलं आणि कल्याण नगरीत  सर्वांगसुंदर महोत्सव भरवीत आहात. याचा आम्हाला आपला सार्थ  अभिमान आहे अशा भावना व्यक्त केल्या. सर्वसमावेशक, सर्वस्पर्शी व सर्वव्यापी प्रास्ताविक विकास पाटील यांनी केले. बहारदार सूत्रसंचालन श्री विनोद शेलकर व सौ वर्षा पाटील या द्वयीनी केले .स्वागत,सत्कार व सन्मान सर्व काही देखणं आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं...एक शानदार आणि दमदार कार्नीव्हल...!


ग्लोबल खान्देश महोत्सव : दुसरा दिवस

ग्लोबल खान्देश महोत्सव म्हणजे आनंदाची,उत्साहाची व उल्हासाची पर्वणी... महोत्सवाचा दुसरा दिवस म्हणजे सर्वकाही विसरा असा होता. विविध आणि नावीन्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांची जणू रेलचेलच...बहारदार संगीत,शानदार नृत्य, दमदार गायन आणि जानदार वादन यांचा सुरेख संगम याचा आस्वाद रसिक प्रेक्षकांना अनुभवता आला...खान्देशी कलाकारांचे स्टेजवरील चित्तथरारक परफॉमन्सेस,कलाकारांचा स्टेजवरील लक्षवेधी वावर आणि संचार, कलाकारांच्या 

 चित्ताकर्षक हालचाली आणि देहबोली...सर्वकाही मंत्रमुग्ध करणारं,मन प्रसन्न करणारं... सर्व काही केवळ लाजवाबच....पाहुण्यांचं आगमन,स्वागत,सत्कार,आदरातिथ्य, मानसन्मान आणि पाहुण्यांचा संदेश हीच खरी महोत्सवाची खासियत...खान्देशी खाद्य पदार्थांची मेजवानी, खान्देशी संस्कृतीची झलक आणि खान्देशी कलाकारांची सांगतिक सफर...दर्दी रसिकांची गर्दी म्हणजे संपुर्ण कल्याणकरांसाठी जणू कार्यक्रमाची वर्दीच होती...!*ग्लोबल खान्देश महोत्सव:तिसरा दिवस*

नृत्य कला दिग्दर्शक तथा कोरिओग्राफर मा. श्री. आशिष पाटील यांचा दमदार आणि कसदार परफॉर्मन्स कल्याणकरांसाठी मनोरंजनाची,कलेची एक नेत्रसुखद मेजवानीच होती त्याचप्रमाणे

बाल सेलिब्रेटी कु. आराध्या दीप्ती योगेंद्र पाटील झी मराठी शिवा मालिका, प्रेमास  रंग यावे, गाथा नवनाथाची आणि तुझी माझी जोडी जमली या मालिका मध्ये आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखविणारी बाल कलाकार  म्हणून महोत्सवांचे आकर्षण बिंदू ठरली...याप्रसंगी महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांची मुलुख मैदान तोफ तथा शिक्षक माऊली आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, माजी नगरसेवक सुनील वायले साहेब यांची उपस्थिती प्रेरणा व ऊर्जा देणारी होती... मा. ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांनी खान्देशी संस्कृतीचं, खाद्य पदार्थांचं, खान्देशी माणसाचं मनापासून कौतुक केलं. खान्देशी माणूस पाण्यासारखा आहे. पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाये वैसा...!

कल्याण शहरातील खान्देशचं भुषण अर्थात शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख मा.श्री. रवि नाना पाटील यांनी आपल्या मनोगतातून  खान्देशी कला, खाद्य, कृषी संस्कृती आणि रुढी, परंपरा यांचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम उत्तर महाराष्ट्र खान्देश  मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विकास पाटील सर आणि त्यांची संपुर्ण टीम करतेय ही साधी सोपी गोष्ट  नाही. त्यासाठी अर्थ नियोजन, कार्यक्रम नियोजन तीन महिन्यापूर्वीच करावं लागतं याचा मला अनुभव आहे. याप्रसंगी सर्व खान्देशी मंडळानी एकजुटीने व एकत्रितपणे  काम  करणं गरजेचं आहे. असं सुचविलं....!

चार दिवस चालणाऱ्या या ग्लोबल खान्देश महोत्सवामध्ये खान्देश मधील अलौकिक, साधारण आणि असामान्य समाज कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला. हिंदकेसरी सुवर्णपदक विजेते श्री पैलवान युवराज वाघ यांना खान्देश भूषण तर पद्मश्री श्री चैत्राम पवार यांना खान्देश रत्न व भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हाध्यक्ष श्री नरेंद्र सूर्यवंशी यांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर श्री. बी. एन. पाटील, श्री विजयजी महाजन, सचिव महाराष्ट्र राज्य श्री हेमराज बागुल, नृत्यकार आशिष पाटील, त्याचबरोबर कोकीलाबेन हॉस्पिटलचे व्हाईस प्रेसिडेंट श्री रामचंद्र भिवसने यांना खान्देशश्री सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

 चौथ्या दिवशी म्हणजे समारोपाला महसूल मंत्री माननीय श्री बावनकुळे साहेब त्याचबरोबर कल्याण पूर्व च्या आमदार सुलभा गायकवाड यांनी उपस्थित राहून खान्देशातील संस्कृतीचे तोंड भरून कौतुक केले. खान्देशी माणूस हा खूप कष्ट करणारा आहे, मेहनत करणारा आहे...आणि म्हणून मुंबईमध्ये येऊन त्याने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. याप्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार माजी महापौर मोरेश्वर भोईर शक्तिवान भोईर ,अर्जुन म्हात्रे, शत्रुघन भोईर अनेक मान्यवर उपस्थित होते.

उत्तर महाराष्ट्र खान्देश मंडळाची  सांस्कृतिक टीम म्हणजे मनोरंजनाची व कला अविष्काराची खाणंच आहे. सुंदर सुंदर गाणी आणि सुंदर सुंदर नृत्य यांची धमाल आणि कमाल होय.... याप्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांचा खान्देशी टोपी आणि उपरणे देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.दिमाखदार व दैदीप्यमान  कार्यक्रमाची आजच्या दिवसाची सांगता झाली...!

खानदेश महोत्सव 2025 च्या आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री विकास पाटील, उपाध्यक्ष श्री प्रदीप अहिरे, श्री एन एम भामरे, श्री एल आर पाटील, श्री दिगंबर बेंडाळे, 

सचिव श्री दीपक पाटील, श्री किशोर पाटील, श्री सुभाष सरोदे, श्री अमोल बोरसे, खजिनदार श्री ए जी पाटील, श्री संजय बिराले, श्री एस एन पाटील मंडळाचे सल्लागार श्री भरत गाडे, श्री रघुनाथ भदाणे, श्री गणेश भामरे, श्री सुनील चौधरी, श्री मंगेश भामरे, सदस्य श्री अनिरुद्ध चव्हाण, श्री संदेश पाटील, श्री सतीश पाटील, श्री डी पाटील, श्री जितेंद्र सोनवणे, श्री जगदीश पाटील, श्री भूषण चौधरी, श्री दीपक राजपूत, श्री भरत पाटील, श्री प्रशांत भामरे श्री किशोर पाटील, प्रसिद्धीप्रमुख श्री सुनील इंगळे इत्यादी कार्यकर्त्यांनी या ग्लोबल महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले. 

त्याचबरोबर सर्व  उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या वतीने आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव २०२५ चे दहावे वर्ष यशस्वीपणे संपन्न झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.