Header Ads

Header ADS

सिगारेटच्या किमतीरुन टपरी चालक आणि ग्राहकामध्ये तुंबळ हाणामारी, अवघ्या एका रुपयासाठी जीव गेला


 सिगारेटच्या किमतीरुन टपरी चालक आणि ग्राहकामध्ये तुंबळ हाणामारी, अवघ्या एका रुपयासाठी जीव गेला


लेवाजगत न्युज नाशिक:- सिगारेटच्या किमतीवरून झालेल्या हाणामारीनंतर एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली.  अवघ्या एका रुपयावरुन पान टपरी आणि ग्राहकामध्ये वाद झाला आणि त्याचं पर्यवसन हाणामारीत झालं. यामध्ये ग्राहकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विशाल भालेराव असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

विशाल भालेराव हा बापू सोनवणेच्या पान टपरीवर सिगारेट घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला सिगारेटची किंमत 11 रुपये अशी सांगण्यात आली. 10 रुपयाची सिगारेट 11 रुपयांना का विकतो यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्या वादाचे पर्यवसन मारामारीत झालं. त्यामध्ये विशाल भालेरावच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

डोक्याला दुखापत झाल्यानंतर विशाल भालेराव घरी आला आणि त्याचा मृत्यू झाला. मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाली की त्यामागे आणखी काही कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाही. प्रेताचं शवविच्छेदन पूर्ण झालं असून त्याचा अहवाल आल्यानंतरच खरे कारण समोर येईल. अंबड पोलिस ठाण्यात याबद्दल गु्न्हा नोंद करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा

अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचा राज्य उपाध्यक्ष शंतनु कुकडे याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचाराचा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

शंतनु कुकडे याचा पुणे कॅम्प परिसरात आलिशान बंगला आहे. या बंगल्यात तो गरजु विद्यार्थांसाठी राहण्याची सोय करतो. काही महिन्यांपूर्वी या बंगल्यात दोन मुली राहण्यासाठी आल्या होत्या. त्यापैकी एक अल्पवयीन होती. या दोन मुलींनी शंतनु कुकडेने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार केल्यानंतर कुकडेवर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आलाय. शंतनु कुकडे हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय होता. त्याचमुळे पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्षपद त्याच्याकडे सोपवण्यात आलं होतं.

पुण्यात एका बंगल्यात तो डान्सबार चालवत असल्याचा धक्कादायक प्रकारही सुरू असल्याची चर्चा आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून शंतनू कुकडेवर काय कारवाई होते हे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.