भालोद महाविद्यालयात जागतिक चिमणी दिन साजरा
भालोद महाविद्यालयात जागतिक चिमणी दिन साजरा
लेवाजगत न्यूज भालोद -येथिल कला व विज्ञान महाविद्यालय येथे पर्यावरण क्लब व प्राणिशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्राणिशास्त्र विभागात जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला प्रसंगी अध्यक्षस्थानी प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ अजय कोल्हे होते. प्रा चंद्रकांत वानखेडे यांनी चिमणी संवर्धनाचे महत्त्व विशद केले. चिमण्याच्या संख्येत घट देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात 'चिऊताई'चा चिवचिवाट दिसून येतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून चिमण्याच्या संख्येत घट होताना दिसत आहे. चिमण्यांच्या संख्येत घट होण्यामागं विविध कारणं आहेत. अधुनीकीकरणामुळं चिमण्यांची संख्या कमी होत असल्याचं दिसून येत आहेत. मानवी वस्तीजवळ राहणारी चिमणी नेहमीचं मानवापासून चार हात लांब राहते. घरातील छतावर, झाडांवर यांचं मुख्यत: वास्तव्य असतं. चिमणी हा पर्यावरणाचा महत्त्वाचा भाग असल्यानं चिमणी संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी २० मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. चिमण्यांना घरट्यासाठी जागा अन्न व पाणी देऊन चिमण्यांचे संरक्षण व संवर्धन करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे असेही त्यांनी विशद केले. प्रस्ताविक प्रा डॉ मीनाक्षी वाघुळदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की चिमण्यांच्या घटत्या संख्येमुळं विविध परिसंस्थांवर गंभीर परिणाम होत आहेत. चिमण्यांची संख्या कमी झाल्याचा थेट परिणाम शेतातील पिकांवर देखील दिसून येतोय. पिकांवर होणाऱ्या रोगांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे चिमण्यांचं मुख्य अन्न अळ्या, लहान किडे आहे. मात्र, या अळ्या किडे मारण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणा किटकनाशकांचा वापर करत आहेत. त्यामुळं चिमण्याच्या अन्नाचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडं चिमण्यांची संख्याचं कमी झाल्यानं पिकांवर पुन्हा एकदा किटकांचा प्रभाव वाढताना दिसतोय. त्यामुळं शेतकऱ्याच्या उत्पादनात घट होताना दिसतेय. प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ अजय कोल्हे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की शहरी वातावरण वाढती लोकसंख्या अतिरिक्त रसायनांची व कीटकनाशकांची फवारणी जल वायू माती ध्वनी प्रदूषणामार्फत होत असलेले पर्यावरणाचा ऱ्हास मोबाईलचा व्हाट्सअप वापर व त्यापासून निघणारे रेडिएशन इत्यादी कारणांमुळे चिमण्यांची संख्या दिवसेदिवस गटात चालली आहे पुढच्या पिढीला चिमण्या फक्त चित्रात दाखवाव्या लागू नयेत यासाठी संवर्धनाची गरज असण्याची आवश्यकता आहे. प्राचार्य प्रा किशोर कोल्हे यांनी जागतिक चिमणी दिनाचा उद्देश म्हणजे घरातील चिमण्या व इतर पक्षांवर प्रेम करणे तसेच आपल्या अंगणात त्यांना जागा व अन्न देणे व त्यांचे संवर्धन करावे असा संदेश देऊन सदर उपक्रमास शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत