"तब्बल ३०वर्षांनी पुन्हा एकदा भरली शाळा"
"तब्बल ३०वर्षांनी पुन्हा एकदा भरली शाळा"
लेवाजगत न्यूज उरण:सुनिल,ठाकूर-आपापली सर्व कामे बाजूला ठेवून महात्मा गांधी विद्यालय दिघोडे ता. उरण या विद्यालया च्या सन १९९३-९४ च्या १० वी बॅचचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी रविवार दिनांक २३ मार्च २०२५ रोजी तब्बल ३० वर्षांनी प्रथमच एकत्र आले. धारु रिसॉर्ट , रानसई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी विद्यालयाचे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मयत झाले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सकाळी १० वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांनी आपल्या गुरुजनांसोबत आणि मित्र मैत्रिणी सोबत खूप धमाल करून जुन्या आठवणींना उजाला दिला.
शशिकांत ठाकूर (दिघोडे), सचिन वाणी( दिघोडे), परमानंद पाटील (धुतुम), सज्जन जोशी (टाकी), सौ. मंगला चिर्लेकर (विंधणे), सौ. सुवर्णा गावंड (पिरकोन) यांनी सर्वांशी संपर्क साधल्याने जवळपास ५० विद्यार्थी विद्यार्थिनी जमा झाले होते. सर्व मित्र-मैत्रिणींचा कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी मोलाचा वाटा होता. हे सर्वजण आता वयाच्या ४५ च्या घरातील झाले आहेत. सर्वांनी प्रथम आपला कौटुंबिक आणि वैयक्तिक परिचय करून देऊन आजवर जीवनात आलेले चांगले वाईट प्रसंग सर्वांसमोर व्यक्त केले.
या मेळाव्याला विद्यार्थ्यांसोबत त्यांचे गुरुवर्य सेवानिवृत्त प्राचार्य श्री. नाथा नाईक सर, सेवानिवृत्त प्राचार्या सौ. छाया कोल्हे मॅडम, सेवानिवृत्त शिक्षिका सौ. आशा पाटील मॅडम ,सेवानिवृत्त शिक्षक अंकुश नाईक सर ,संजय फल्ले सर, जितेंद्र पिंपरे सर हजर होते. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना आपण संपूर्ण आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असा मोलाचा संदेश दिला.
आपण वर्गातील ज्या बेंचवर बसलो होतो तो बेंच आणि वर्गात शिकवत असताना गुरुजनांनी केलेली शिक्षा अशा विविध प्रसंगातून पूर्ण दिवसभर सर्व विद्यार्थ्यांनी आनंद लुटण्याचा प्रयत्न केला. तब्बल 30 वर्षांनी असं मुक्त व्यासपीठ मिळाल्याने सर्वांनी मनमुराद आनंद घेतला. महेश पाटील यांनी कविता सादर केली.
दुपारी जेवण उरकल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्यासोबत गुरुजनांनी प्रसन्न कोळी यांच्या डी.जे.च्या ठेक्यावर ताल धरून कार्यक्रमाची रंगत वाढवण्याचा प्रयत्न केला.
" लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला " या उक्तीला लाजवेल असा हा सोहळा साजरा करून संध्याकाळी ५ वाजता एकमेकांचा निरोप घेऊन डोळे ओले करत साश्रू नयनांनी सर्वांनी आपल्या घरचा रस्ता धरला आणि पुन्हा लवकरच एकत्र येऊ असा आशावाद व्यक्त केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत