वैद्यकशास्त्राला अध्यात्म विद्येची जोड असावी-ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे
वैद्यकशास्त्राला अध्यात्म विद्येची जोड असावी-ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे
लेवाजगत न्यूज उरुळी कांचन: अध्यात्माद्वारे आत्मशुद्धी किंवा मानसिक शुद्धीकरण होते. शारीरिक व्याधी रोगमुक्तीसाठी वैद्यकशास्त्र आहे. परंतु वैद्यकशास्त्रात मानसिक किंवा आत्मिक शुद्धी होत नाही. केवळ होमिओपॅथीमध्ये शारीरिक व मानसिक विचार होतो. तसेच शरीर हे अर्जुन रुपी क्रिया कर्मयोगाचे प्रतीक आहे. आणि आत्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण अर्थात द्वारकाधीश आहे.म्हणजे जेथे भगवान श्रीकृष्ण आहे तेथेच धनुर्धारीअर्जुन आहे व गीतेतीलअठराव्या अध्यायातील शेवटच्या श्लोकांनुसार यश,वैराग्य ,उदारता लक्ष्मी, ऐश्वर्य, ज्ञान व मोक्षप्राप्ती त्याच ठिकाणी असते.म्हणून सदृढ शरीरामध्ये अर्जुन व द्वारकाधीश असल्याशिवाय शरीर जिवंत व क्रियाशील राहू शकत नाही म्हणून वैद्यक शास्त्राला अध्यात्मिक जोड अत्यंत महत्त्वाची आहे असे मत डॉ. वेल फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाजसेवक प्रवचनकार डॉ.रवींद्रजी भोळे यांनी येथे व्यक्त केले. येथे श्री द्वारकाधीश हॉस्पिटल अँड होमिओपॅथिक केअर सेंटरचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.रवींद्र भोळे यांचे हस्ते करण्यात आले याप्रसंगी वरील मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी भारत नाट्यम नृत्य, व इस्कॉनच्या मुलांनी भजने गायन सादर केले. याच कार्यक्रमांमध्ये धन्वंतरी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. उद्घाटक ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळेयांना धन्वंतरी पुरस्कार श्री सुदामा प्राणदास (इस्कॉन मंदिर पुणे )यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्रीमान सुदामा प्राणदास, श्री बलराम दुलालदास, श्री देवकी सुतदास, श्री हिमावत गोपालदास, मा सौ प्रतिभाताई कांचन, एडवोकेट राहुल कदम( सचिव बार असोसिएशन पुणे), समीर थिगळे( पुणे जिल्हाध्यक्ष मनसे), श्री पवन दिनकर रावळ (माजी असिस्टंट सप्रेडेंट इरिगेशन डिपार्टमेंट,) श्री राजन रावळ( नायब तहसीलदार, )श्री दिलीप कटके, श्री मदन रावळ,(माझी इस्टेट ऑफिसर कोल्हापूर महानगरपालिका) श्री साजन रावळ, (सीनियर एक्झिक्यूटिव्ह इंजिनिअर इरिगेशन डिपार्टमेंट )श्री गणेश भोकरे, (मनसे नेते विधानसभा कसबा )श्री प्रशांत गिड्डे (सोलापूर जिल्हाध्यक्ष मनसे,) डॉ. गणेशजी आखाडे (अध्यक्ष डॉक्टर वेल्फेअर असोसिएशन उरुळी कांचन,) माजी अध्यक्ष डॉ. संतोष राठोड, माजी अध्यक्ष डॉ.रवींद्र अष्टेकर, डॉ. रोहित कोळेकर, डॉ अनिल निगडे, ह भ प तुषार चौधरी, श्री साईनाथ बाबर (पुणे शहर अध्यक्ष मनसे), श्री रामदास दरेकर (पुणे जिल्हाध्यक्ष मनसे) , आयोजक डॉ.विनायक पाटील, सौ मिनल विनायक पाटील, रावळ,कोरे, बटाने , मगदूम, खोजगे, अडगे, व परिसरातील अनेक गावकरी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत