जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; तूर खरेदी नोंदणीला मुदतवाढ!
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; तूर खरेदी नोंदणीला मुदतवाढ!
लेवाजगत न्यूज जळगाव दि-27 (जिमका):- केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराने (हमीभाव) नाफेड अंतर्गत २०२४-२५ हंगामातील तूर खरेदीसाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता शेतकरी ८ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकतात.
जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव अशा एकूण १६ खरेदी केंद्रांवर ही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.
तुर खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी अंतिम तारीख ८ एप्रिल २०२५ आहे. तर खरेदीचा कालावधी १३ फेब्रुवारी २०२५ ते १३ मे २०२५ दरम्यान असणार आहे. तुर हमीभाव ७५५० रुपये प्रति क्विंटल इतका आहे.
शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, बँक पासबुक, ऑनलाइन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा आणि ८ अ ही कागदपत्रे घेऊन जवळच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय संचालक मंत्री संजय वामनराव सावकारे, उपाध्यक्ष रोहितदादा दिलीपराव निकम, संचालक संजय मुरलीधर पवार आणि प्र. जिल्हा पणन अधिकारी एस.एस. मेने यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत