Header Ads

Header ADS

फैजपूर येथील जे.टी. महाजन इंजीनियरिंग कॉलेज तर्फे मोफत ऑनलाईन सीईटी सराव परीक्षाचे आयोजन

 

JT Mahajan Engineering College, Faizpur, organizes free online CET practice exam




फैजपूर येथील जे.टी. महाजन इंजीनियरिंग कॉलेज तर्फे मोफत ऑनलाईन सीईटी सराव परीक्षाचे आयोजन


लेवाजगत न्यूज फैजपूर-येथील जे.टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेज मार्फत बारावी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी लागणाऱ्या एमएचटी-सीइटी परीक्षेचा सराव व्हावा या उद्देशाने विद्यार्थ्यांना या प्रकारच्या तीन मोफत सराव परीक्षा देता येतील. 

    पहिल्या मोफत ऑनलाइन सीईटी सराव परीक्षेचे आयोजन दिनांक ३१ मार्च रोजी, दुसरी सराव परीक्षा दिनांक ७ एप्रिल व तिसरी सराव परीक्षा दिनांक १२ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा एमएचटी- सीइटी च्या पॅटर्ननुसारच होणार आहे. विद्यार्थी ही परीक्षा घरूनच मोबाईल किंवा लॅपटॉप द्वारा देऊ शकतो. या परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्याला चाप्टर नुसार रिझल्ट अनालिसिस व सोल्युशन पण मिळणार आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्याला खरी परीक्षा देण्याचाच अनुभव घेता येईल त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व गुणवत्ता वाढीसाठी खूप फायदा होईल. 

अजूनही ज्यांनी या सराव परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले नसेल तर ते विद्यार्थी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकतात.

https://www.testkatta.com/stdregeng.php?s=641

या मोफत सराव परीक्षेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्था अध्यक्ष शरद महाजन, संचालक मंडळ, प्राचार्य, उपप्राचार्य,अकॅडमीक डीन व सर्व विभाग प्रमुख यांनी केले आहे. अधिक माहिती साठी डॉ.के.जी. पाटील(9637071291),डॉ.जी.इ.चौधरी(9423974207) व प्रा.जे.बी.भोळे(9325188982) प्रा.पी.पी.ठोंबरे(9403572155) यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.