Header Ads

Header ADS

इंस्टाग्राम वर ओळख नागपूरची अल्पवयीन मुलगी दहिगाव येथे पळून

इंस्टाग्राम वर ओळख नागपूरची अल्पवयीन मुलगी आली दहिगाव ला आली पळून



 इंस्टाग्राम वर ओळख नागपूरची अल्पवयीन मुलगी  दहिगावला आली पळून 



Ttms shyam



प्रशासनाने रोखला बालविवाह 

लेवाजगत नूज यावल -तालुक्यातील दहिगाव येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा १९ वर्षीय युवकासोबत बालविवाह लावला जात होता. ही माहिती मिळताच एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी दहिगाव गाठून बालविवाह रोखला. २७मार्चला सकाळी १०.३० वाजता ही कारवाई झाली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अल्पवयीन मुलीला बालसरंक्षण समितीकडे सोपवण्यात आले.


दहिगाव येथील पटेल मोहल्ल्यात ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय १९) याचा एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत बालविवाह लावला जात होता. ही माहिती यावलच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने दहिगाव गाठून बालविवाह रोखला. दोन्ही कुटुंबीयांना यावल पोलिस ठाण्यात आणले. ही मुलगी नागपूर जिल्ह्यातील असून विवाह होत असताना तिच्यासोबत कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते, असे अर्चना आटोळे यांनी सांगितले. यानंतर अल्पवयीन मुलीस जळगाव येथील बाल सरंक्षण समितीकडे सोपवण्यात आले.


मुलीचे कुटुंबीय दहिगाव येथे आले अन् लगेच परत गेले


      बालविवाह रोखलेला अल्पवयीन मुलगी ही नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील रहिवासी आहे. इन्स्टाग्रामवर ज्ञानेश्वर पाटील या युवकासोबत तिची ओळख व नंतर प्रेमसंबंध जुळले. या प्रेमातून तीने घरून पलायन करून दहिगाव गाठले. ही माहिती कळताच मुलाच्या कुटुंबीयांनी मुलीच्या घरी माहिती दिली. यानुसार ते दहिगावात आले. पण मुलीला सोबत नेणार नाही. तुम्ही लग्न लावून घ्या असे सांगून ते निघून गेल्याचे पाटील कुटुंबीयांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.