हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त सावद्यात प्रभात फेरीचे आयोजन
हिंदू नववर्ष गुढीपाडव्यानिमित्त सावद्यात प्रभात फेरीचे आयोजन
लेवा जगत न्यूज सावदा- दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री स्वामीनारायण मंदिर सावदा यांच्यातर्फे हिंदू नववर्ष गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा रविवार दिनांक ३० मार्च २०२५ या दिवशी आयोजन करण्यात आले आहे.
सावदा शहरातील पुरुष, महिला,युवक,युवती,वृद्ध, जेष्ठ नागरिक यांना आवाहन करण्यात येते की गुडीपाडवा दिवशी निघणाऱ्या प्रभात फेरी सर्वांनी सहभाग घ्यावा व हिंदू नववर्षाचे जल्लोषात स्वागत करावे.ही प्रभात फेरी श्री स्वामीनारायण मंदिर सावदा येथून सकाळी सात वाजता निघणार असून सुभाष चौक,मोठा आड, पाटील पुरा,लहान मारुती, इंदिरा गांधी चौक,छत्रपती संभाजी महाराज चौक, चांदणी चौक,जुनी कन्या शाळा,गांधी चौक,इंगळेवाड, गवत बाजार,शारदा चौक, माळीवाडा,रविवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक,वंजारवाडी,दादा गल्ली,कॉर्नर रोड मार्गे निघणार असून या प्रभात फेरीत स्वामीनारायण मंदिराचे कोठारी स्वामी शास्त्री स्वयंप्रकाश दासजी, शास्त्री विश्व प्रकाश दासजी, स्वामीनारायण गुरुकुलचे उपाध्यक्ष शास्त्री स्वामी अनंत प्रकाश दासजी, सत्यप्रकाश दासजी, माधव स्वामी यांच्या उपस्थितीत निघणार आहे.
तरी सावदा शहरातील हरी भक्तांसह नागरिकांनी या प्रभात फेरीत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत