अन्न सुरक्षा योजना लाभार्थीना ३१ पर्यंत ई केवायसीची मुदत,पुरवठा विभागात येण्याची गरज नाही, घरबसल्या करा प्रक्रिया
अन्न सुरक्षा योजना लाभार्थीना ३१ पर्यंत ई केवायसीची मुदत ,पुरवठा विभागात येण्याची गरज नाही, घरबसल्या करा प्रक्रिया
लेवाजगत न्यूज सावदा-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत लाभार्थींना आता मोबाइलद्वारे घरबसल्या रेशनकार्डची ई केवायसी करता येणार आहे. त्यासाठी ३१ मार्च ही शेवटची मुदत असल्याची माहिती रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांनी दिली.
महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने संयुक्तपणे Mera. E.KYC हे अॅप सुरू केले आहे. त्यामुळे राज्यातील अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थींना घरबसल्या काही मिनिटांमध्ये त्यांच्या रेशनकार्डची आणि कुटुंबातील सदस्यांची ई केवायसी पूर्ण करता येईल. त्यासाठी लाभार्थ्यांना इकेवायसीसाठी रेशन दुकानांवर जाण्याची गरज नाही. ही प्रक्रिया अतिशय सोपी असून ती चेहरा प्रमाणीकरणावर आधारित आहे. इ केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थींना मोबाइलमध्ये Mera E.KYC हे अॅप व आधार फेस आयडी सर्व्हिस अॅप डाउनलोड करावे लागेल. यानंतर मेरा केवायसी अॅप उघडावे आणि आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात. नंतर चेहराप्रमाणीकरण करावे. कुटुंबातील कोणत्याही सदस्यांचे ईकेवायसी करताना बॅक कॅमेरा वापरावा. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या प्रणालीद्वारे पडताळणीची कार्यवाही आपोआप होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यावर मोबाइलच्या स्क्रीनवर केवायसी यशस्वी झाल्याचा संदेश दिसेल. इकेवायसी स्टेटसमध्ये Y दिसत असेल तर प्रक्रिया पूर्ण समजावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत