आईच्या निधनानंतर अग्निडाग व खांदे देऊन शेवटी इच्छाही पूर्ण केली सहा मुलींनी
आईच्या निधनानंतर अग्निडाग व खांदे देऊन शेवटी इच्छाही पूर्ण केली सहा मुलींनी
लेवा जगत न्यूज सावदा- येथील तेलीवाडा परिसरातील रहिवासी उषाबाई रमेश चौधरी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना मुलगा नसल्याने सहा मुली त्यांना होत्या,उशाबाईंनी जिवंत असताना आपल्या आप्तेष्ट व मुलींसोबत इच्छा प्रगट केली होती,माझे जर निधन झाले तर सहाही मुलींनी मला खांदा देऊन अग्नीडाग मुलींनीच द्यावा.त्याप्रमाणे सहाही मुली ज्योती संजय चौधरी, भारती अमर चौधरी,मनीषा चारुदत्त चौधरी,शैला नाना चौधरी, वैशाली विष्णू चौधरी,नंदा हेमंत चौधरी यांनी आई उशाबाईच्या अंत्ययात्रेत तिरडीला खांदा देऊन स्मशानभूमीत परिसरातील नातेवाईक महिलांसह त्या गेल्या हा नवा पायंडा आज सावदा शहरात तेली वाड्यात पडला.त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे खुशाल सिताराम चौधरी व लक्ष्मीकांत दिनकर चौधरी यांनीही सहभाग घेतला.उषाबाईंना त्यांची लहान मुलगी व पुतण्यांनी ने अग्नीडाग दिला. या या आदर्श सामाजिक प्रथेचे सर्व परिसरात कौतुक होत आहे
उषाबाई रमेश चौधरी यांच्या पश्चात पती,सहा मुली, जावई,नातू नातवंडे,पणतू,पुतणे असा परिवार असून त्या रमेश चौधरी यांच्या पत्नी व तर ज्योती संजय चौधरी, भारती अमर चौधरी,शैला नाना चौधरी,वैशाली विष्णू चौधरी, नंदा हेमंत चौधरी यांच्या आई तर खुशाल सिताराम चौधरी,लक्ष्मीनारायण दिनकर चौधरी यांच्या काकू होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत