Header Ads

Header ADS

राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कारार्थींची अंतिम निवड यादी जाहीर : २ फेब्रुवारीला रावेरला सन्मान सोहळा

 

State-level-Agriculturist-Awardees-Final-Selection-List-Announced-on-2-February-Raverla-Honor-Ceremony

राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कारार्थींची अंतिम निवड  यादी जाहीर  : २ फेब्रुवारीला रावेरला सन्मान सोहळा

 लेवाजगत न्यूज सावदा-साप्ताहिक कृषीसेवकतर्फे वर्धापनदिनाचे औचित्य साधून गेल्या सहा वर्षापासून राज्यातील शेती व शेतीशी निगडीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय कृषीसेवक पुरस्कार* देवून सन्मान करण्यात येतो. येत्या २ फेब्रुवारीला हा सन्मान सोहळा रावेर ता. रावेर जि जळगाव येथे संपन्न होत आहे. या सन्मान सोहळ्यासाठी राज्यातून निवड झालेल्या पुरस्कारार्थींच्या नावाची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे.

     पुरस्कार सन्मान सोहळ्याचे यंदाचे हे सातवे वर्ष असून शाल,पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रावेर येथील स्टेशन रोडवरील कै शेनाबाई गोंडू पंडित मराठा समाज मंगल कार्यालयात २ फेब्रुवारी २०२५ रोजी(रविवार) हा सन्मान सोहळा सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. आदर्श शेतकरी, युवा शेतकरी, महिला शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी तज्ञ, कृषी उद्योजक, कृषिमित्र, कृषी बचत गट, कृषी विज्ञान केंद्र, फार्मर प्रोड्युसर कंपनी, कृषी लेखक (साहित्यिक) या विविध गटातून निवड झालेल्या पुरस्कारार्थींच्या नावाची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. हि यादी २३ डिसेंबरच्या साप्ताहिक कृषीसेवक अंकात, तसेच www.krushisewak.com या वेब न्यूज पोर्टलवर प्रकाशित केली जाणार आहे. पुरस्काररार्थींच्या कार्याची समाजाला ओळख व्हावी म्हणून *पुरस्कारार्थींच्या कार्याच्या “गौरव विशेषांक”चे* या सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच पुरस्कारार्थींच्या निवडीचा व सन्मान सोहळ्याचा सोशल मिडियाद्वारे प्रचार व प्रसार अधिकाधिक लोकांपर्यंत करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर निवड झालेल्या पुरस्कारार्थीने स्वताचा चांगला पासपोर्ट आकाराचा फोटो पाठवावा. (संपर्क : कृष्णा पाटील संपादक साप्ताहिक कृषी सेवक मो 94042 43515)   


 कृषीरत्न कृषीसेवक पुरस्कार:   प्रकाश दादाभाऊ नेहरकर (रा एडगाव ता जुन्नर जि पुणे), मोहनसिंग गणेशसिंग राजपूत (रा बेटावद खुर्द ता जामनेर जि जळगाव)


आदर्श शेतकरी कृषीसेवक पुरस्कार  :किशोर हरीश गणवाणी (रा रावेर ता रावेर जि जळगाव), ज्ञानेश्वर भाऊ आवळे (रा कुरकुंडी ता खेड जि पुणे), बाळकृष्ण उत्तम बंडगर (रा होलेवाडी ता कोरेगाव जि सातारा), भगवंता शंकर नांगरे (रा उंडेखडक ता जुन्नर जि पुणे), विजय भागवत पाटील (रा पांगरा ता नागद जि छत्रपती संभाजीनगर), चंद्रकांत रामचंद्र पाटील (रा डहाणू आगर ता डहाणू जि पालघर), गिरीश रमेश परतणे (रा अहिरवाडी ता रावेर जि जळगाव), बाळकृष्ण वासुदेव पाटील (रा कंडारी ता नांदुरा जि बुलडाणा), हेमंत वाल्मिक पवार (रा निंभोरा ता रावेर जि जळगाव).


आदर्श युवा शेतकरी कृषीसेवक पुरस्कार : किरण अशोक सूर्यवंशी (रा बांबरूड राणीचे ता पाचोरा जि जळगाव), कृष्णा संजय आरोटे (रा गाजरवाडी ता निफाड जि नाशिक), राजेंद्र अनापसिंग वसावे (रा काठी ता अक्कलकुवा जि नंदुरबार), नितीन प्रकाश पाटील (रा नेहेता ता रावेर जि जळगाव), विवेक शंकर माने (रा औन्ढी ता मोहोळ जि सोलापूर), प्रमोद भास्कर मोपारी (रा नेहेता ता रावेर जि जळगाव )


कृषी शास्त्रज्ञ कृषीसेवक पुरस्कार :कोमल अशोक  चव्हाण (राहुरी),


कृषीमित्र कृषीसेवक पुरस्कार :देवेंद्र वामनराव बाणाईत (रा  नागपूर), सुनील मधुकर पोकरे (रा पुणे),  रुपेश रामदास दिघे (रा काठापूर खुर्द ता शिरूर जि पुणे), विश्वनाथ प्रभाकर मुखरे (रा बोरी खुर्द ता पुसद जि यवतमाळ), निखील रमेश यादव (रा आर्वी ता सेलू जि वर्धा)


आदर्श कृषीसेवक कृषी संस्था : मंदप्रभा फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड (शिखर शिंगणापूर ता मान जि सातारा), प्रकाश रमेश देवरवाडे ऑर्गानिक ग्रामीण किसान शेतकरी गट (देवळा ता अंबाजोगाई जि बीड )


आदर्श कृषी उद्योजक कृषीसेवक पुरस्कार :ओम इंजिनीरिंग (सतीश पाटील -निंबोल ता रावेर जि जळगाव), कृषीकन्या अग्रो इंडस्ट्रीज(काव्या राजेश दातखिळे-दातखिळेवाडी ता जुन्नर जि पुणे), एमटेल अग्रोटेक प्रा लिमिटेड जळगाव(रामभाऊ शंकर पाटील- उचंदा ता मुक्ताईनगर जि जळगाव )


आदर्श कृषी लेखक कृषीसेवक पुरस्कार :डॉ आदिनाथ ताकटे(राहुरी), डॉ कृष्णा शंकर शहाणे(नाशिक), महेश महाजन(पाल ता रावेर जि जळगाव), डॉ अजय गवळी (नाशिक).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.