फैजपूर येथील गुरुदत्त कॉलनी रहिवाशांना धरणातून येणारा शुद्ध पाणीपुरवठा व्हावा मागणी
फैजपूर येथील गुरुदत्त कॉलनी रहिवाशांना धरणातून येणारा शुद्ध पाणीपुरवठा व्हावा मागणी
लेवा जगत न्यूज फैजपूर- येथील गुरुदत्त कॉलनीतील रहिवाशांनी बुधवार सकाळी पालिका पाणीपुरवठा अधिकारी रुजाता पाटील यांना निवेदन दिले, पिण्यासाठी गुरुदत्त कॉलनी परिसरात शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा यासाठी हे निवेदन देण्यात आले.
गुरुदत्त कॉलनी मध्ये गेल्या काही दिवसापासून रहिवाशांना बोरवेलचे पाणी पिण्यासाठी येत आहे. हे पाणी फिल्टर झालेले नसून हे अशुद्ध पाणी या परिसरात होत आहे. हा बोरवेलचा पाणीपुरवठा बंद करून गुरुदत्त कॉलनी परिसरात धरणावरून येणारे शुद्ध केलेले पाणी पुरवठा करावा असे निवेदन गुरुदत्त कॉलनीतील रहिवासी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी गणेश भालेराव व सेवानिवृत्त शिक्षक एम आय तडवी यांच्यासह परिसरातील महिला व नागरिकांनी पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी रुजाता पाटील यांना एका निवेदनाद्वारे केले आहे.
तरी या निवेदनाचा विचार करून पालिकेचे मुख्याधिकारी यांनी बोरवेल चा पाणीपुरवठा बंद करून नदीवरून येणारा धरणातील शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली आहे ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही पालिकेसमोर आंदोलन करू असाही इशारा देण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत