Header Ads

Header ADS

पुण्यात भीषण अपघात, डंपरने नऊ जणांना चिरडलं, तिघांचा मृत्यू, सहा जण गंभीर

 

पुण्यात भीषण अपघात, डंपरने नऊ जणांना चिरडलं, तिघांचा मृत्यू, सहा जण गंभीर


लेवाजगत न्युज पुणे :- पुण्यात एक मोठी अपघाताची घटना घडलीये. या अपघातात डंपरने फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले आहे. पुणे येथे हा भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. वाघोली केसनंद फाट्यावर ही अपघाताची घटना घडलीये. फूटपाथवर हा डंपर गेला आणि झोपलेल्या 9 जणांना चिरडले. जखमींमधील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. वैभवी रितेश पवार (वय 1 वर्ष), वैभव रितेश पवार वय 3 वर्ष, रीनेश नितेश पवार, वय ३० वर्ष अशी मृतांची नावे आहेत. तर सहा जण जखमी आहेत. जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हे सर्व कामगार आहेत. डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. मृत्तांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.


याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, रविवारी मध्यरात्री कामगार कामासाठी अमरावती येथून कामानिमित्त वाघोली येथे आले होते. रात्री उशीर झाल्याने 12 जण फुटपाथवर झोपले होते. तर काही जण फुटपाथच्या बाजूला झोपले होते. मध्यरात्री साधारण 12.30च्या सुमारस मद्यधुंद अवस्थेत असलेला डंपर चालक वेगात आला आणि फुटपाथवर झोपलेल्या कामगारांच्या अंगावर गेला. यात तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई कारण्याचे काम सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.