"कृषिरत्न" पुरस्कार जाहीर;जळगाव जिल्ह्यातून न्हावीचे सचिन इंगळे;२७ डिसेंबरला राज्यातील ४० शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मान
"कृषिरत्न" पुरस्कार जाहीर;जळगाव जिल्ह्यातून न्हावीचे सचिन इंगळे ;
२७ डिसेंबरला राज्यातील ४० शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मान
लेवाजगत न्यूज नाशिक -भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त २७ डिसेंबरला प्रसिद्ध रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे सकाळी ११ वाजता पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात होणार आहे. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, खासदार भास्करराव भगरे, आमदार राहूल ढिकले, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ जयराम पूरकर, मुंबई आकाशवाणीचे सहायक संचालक डॉ.संतोष जाधव, "इफको"च्या मा. संचालिका साधनाताई जाधव, डॉक्टर किसान चे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनिल दिंडे, छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापिठाचे महासंचालक डॉ मंगेश देशमुख, सेंद्रिय शेतीतज्ञ व कृषिभूषण सदुभाऊ शेळके, अन्न महामंडळाचे सदस्य बापू शिंदे, माजी जि. प. सदस्य गोरकभाऊ बोडके, डॉ. सुभाषराव शिंदे,उद्योजक पांडुरंग चव्हाण आदींच्या शुभहस्ते राज्यातील ४० शेतकऱ्यांचा "कृषिरत्न" पुरस्कार देवून सपत्निक सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती आमची माती आमची माणसं व किसान फार्मर्स फोरमचे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय जाधव यांनी दिली.
पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील न्हावी येथील प्रयोगशील शेतकरी सचिन इंगळे यांचा समावेश आहे. पोपटराव निकम, समाधान वाघ, भटू खैरनार, नामदेव गायकवाड, धनराज जगताप, शितल महाजन, किशोर वाडेकर, भूषण पगार, भाऊसाहेब पवार, अक्षय गिते, बाळासाहेब चव्हाण, गणेश झोमण, योगेश मातेरे, राजेंद्र पगार, सिताराम चव्हाण, गोरख शिंदे, संपत आहेर, गोरख पारधी, अमोल लगड, विनोद परदेशी, ज्ञानेश्वर पवार, साजेदा अल्ताफ शेख, सुनंदा लाड, संभाजी निचळ पाटील, अशोक भोसले, दत्तात्रय ताले, निळकंठ साबळे, लक्ष्मी मोरे, दिनेश पाटील, छाया भिसे, योगेश पाटील, निवृत्ती इंगोले, सुरेश नाठे, सचिन इंगळे (न्हावी ) श्रध्दा कासुर्डे, परशराम निकम, सुनिल बोरसे, ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिभा चावडे यांचा समावेश आहे. ट्राफी, पैठणी साडी, सन्मानपत्र, शेतकरी गौरव विशेषांक असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
यावेळी सेंद्रिय शेतीवर चर्चासत्र, आमची माती आमची माणसं मासिकाचा "शेतकरी गौरव विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे . प्रसिद्ध गायिका रेखा महाजन व सुखदा महाजन यांचा सुमधुर गीतांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्याचे निवेदन कलावंत आणि प्रसिद्ध निवेदक तुषार वाघुळदे हे करणार आहेत.
शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोपीनाथ लामखडे,गोरक्षनाथ जाधव,सुनिल निकम,भगवान खरे,निवृत्ती न्याहारकर,मयुर गऊल,सविता जाधव,शाम गोसावी,वसंत आहेर,उत्तम रौंदळ, नाना पाटील, बाळासाहेब मते,गणेश पाटील,संदीप काळे, सागर रहाणे ,राजेंद्र धोंडगे, विजय पाटील, सुयोग जाधव, शाम खांडबहाले, शांताराम कमानकर,सुनिल गमे,स्नेहल लामखडे आदिंनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत