दुकानं आणि घरांचे मोठे नुकसान, नागरिकांकडून ट्रक चालकास चोप
दुकानं आणि घरांचे मोठे नुकसान, नागरिकांकडून ट्रक चालकास चोप
मद्यधुंद चालकाने पहिल्यांदा दुचाकीला उडवलं, लोकांच्या मारहाणीच्या भीतीने ट्रक गल्ली-बोळातून नेला; घरं आणि दुकानं उडवत गेला
लेवाजगत न्युज लातूर:-मद्यधुंद ट्रक चालकाने लातूरमध्ये अनेक वाहनं उडवल्याचा प्रकार समोर आलाय. दारु पिऊन ट्रक चालवत ड्रायव्हरने चौघांना जखमी केलंय. याशिवाय, अनेक घराचं आणि दुकानांचेही या अपघातामुळे नुकसान झाले आहेत. सुदैवाने यामध्ये अद्याप कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.
मारहाण आणि कारवाईच्या भीतीने ट्रक गल्लीबोळातून नेला
अधिकची माहिती अशी की, लातूर शहराजवळील लातूर-नांदेड बायपासवरील सिद्धेश्वर मंदिराजवळील एका हॉटेलजवळ ट्रकचालकाने दुचाकीला उडविले. मारहाण आणि कारवाईच्या भीतीने नशेत असलेल्या ट्रकचालकाने बायपास सोडून शहरातील गल्लीबोळात ट्रक भरधाव वेगाने नेला . समोर असणाऱ्या वाहनांची, घरांची आणि दुकानाची पर्वा न करता ट्रक हा सुसाट निघाला होता. अखेर पटेल चौकात ट्रकचा वेग मंदावताच नागरिकांनी चालकास खाली खेचले आणि चोप दिला. यामध्ये अनेक वाहनांचे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दुकानं आणि घरांचे मोठे नुकसान, नागरिकांकडून ट्रक चालकास चोप
महापूर येथील रहिवासी असलेल्या गुरुबा बाबुराव पोतवळे (रा. महाप) हा ट्रक चालक आहे. ऊस कारखान्यावर खाली करुन तो लातूर-नांदेड बायपासवरुन निघाला होता. दरम्यान, पिंटू हॉटेलजवळ त्याने दुचाकीला धडक दिली. अचानक घडलेल्या घटनेमुळे दुचाकींनी त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. कारवाई आणि मारहाण होईल या धास्तीने नशेत असलेल्या गुरुबाने कोणताही विचार न करता ट्रक (एम.एच. 25 यु 2612) थेट शहरातल्या गल्लीबोळात घातली. रिंगरोडवरुन सिद्धेश्वर मंदिरापासून शहरात एंन्ट्री केलेल्या या ट्रकने लाड गल्ली, सुरत शहावली दर्गा, पटेल चौक या मार्गावर उभी असलेली वाहने तर उडवलीच पण दुकानांचे शटर आणि काही पत्र्यांच्या घराचेही नुकसान केले. पटेल चौकात समोरुन कार आल्याने ट्रकचा वेग मंदावला आणि संतप्त लोकांनी त्याला ट्रक मधून बाहेर ओढत चांगलाच चोप दिला.. गांधी चौक पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत