Header Ads

Header ADS

महामार्गावर अपघातात जखमी महिलेसाठी भाजपा कार्यकर्ताने दाखवली तत्परता अपघातग्रस्त महीलेला उपचारार्थ रूग्णालयात केले दाखल

BJP worker shows readiness for woman, admits accident-affected woman to hospital for treatment


महामार्गावर अपघातात जखमी महिलेसाठी भाजपा कार्यकर्ताने दाखवली तत्परता

अपघातग्रस्त महीलेला उपचारार्थ रूग्णालयात केले दाखल


लेवाजगत न्यूज रावेर=बुरहानपूर-अंकलेश्वर महामार्गावर मोटरसायकल आणि कारच्या अपघातात एक महिला जखमी झाली. महामार्गावर पडलेल्या या जखमी महिलेला भाजपाचे युवामोर्चा  जिल्हासरचिटणीस संदीप सावळे यांनी तत्काळ मदत केली आणि जखमी महिलेस  रावेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. कालच एका अपघातात चार युवकांचा बळी गेला असताना, आजही बुरहानपूर-अंकलेश्वर महामार्गावर जंगली पिर नजीक रावेरकडून अहीरवाडीला जाणाऱ्या लताबाई राजू पाटील यांच्या मोटरसायकलला मागून एका कारने धडक दिली. या धडकेत लताबाई पाटील मोटरसायकलवरून खाली पडल्या.


याच वेळी रावेरकडे येत असलेले भाजपाचे युवा मोर्चा  जिल्हा सरचिटणीस संदीप सावळे यांनी ती महिला पाहून तत्काळ मदतीचा हात दिला. त्यांनी आपल्या खाजगी गाडीतून त्या महिलेला उचलून रावेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. लताबाई पाटील यांच्या परिवाराने संदीप सावळे यांचे देवदूताप्रमाणे मदतीसाठी आभार मानले आहेत.

   महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असून, अशा घटनांमध्ये मदतीसाठी तत्पर असलेल्या व्यक्तींचे कार्य कौतुकास्पद आहे. संदीप सावळे यांची तत्परता आणि माणुसकीचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.