Header Ads

Header ADS

देवेंश्री सराफ यांची सुंदर कविता"आजची तरुण पिढी !!" ___कवयित्री__देवेश्री सराफ_फैजपूर

 

देवेंश्री सराफ यांची सुंदर कविता"आजची तरुण पिढी !!"
        ___कवयित्री__देवेश्री सराफ_फैजपूर


चमकत्या चांदण्यांना हाती धरता

बांधू पाहे विज्ञानाची शिडी |

उमजून न उमजणार कोड,

आजची ही तरुण पिढी |


हाती असती ढीगभर डिग्री,

वणवण नोकरी साठी फिरी |

संधी न देता मालक ,

अनुभवा च्या मागण्या करी |


तू पुढे,मी पुढे,

स्पर्धा ही चालूच रे |

पायदळी तुडवून जाती,

भ्रष्टाचारी चेहरे हसरे |


व्यसनाने तो गुरपटलेला ,

बंद करा उत्पादन आधी |

चाहते करी जाहिराती विषाची ,

नग्न होऊन मिळे प्रसिध्दी |


पैशाने कलेचा बाजार रचलाय,

सोशल मीडिया नाच करी |

इंग्रजीचा ताज नसे डोई ,

धुडकावून लावेल ही नगरी |


वेळ कमी पदर झडला ,

पळवत सुटले महागाई|

दोस्त नवा मोबाईल झालाय,

गोंधळलेली तरुणाई |

 

___कवयित्री__देवेश्री सराफ_फैजपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.