Header Ads

Header ADS

व्हॉइस ऑफ मीडियाच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी डॉ. गणेश जोशी आणि उपाध्यक्षपदी तुकाराम सावंत यांची निवड

 

व्हॉइस ऑफ मीडियाच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी डॉ. गणेश जोशी आणि उपाध्यक्षपदी तुकाराम सावंत यांची निवड 

 

लेवाजगत न्यूज मुंबई: (प्रतिनिधी) जागतिक पातळीवर ४३ देशात पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ३ लाख ९० हजार सदस्य संख्या असणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकाराच्या नांदेड जिल्हा पदाधिकारी निवड प्रक्रिया निवडणुकीच्याद्वारे पार पडली. या निवडणुकीमध्ये डॉ. गणेश जोशी यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली.

    तर बाकी पदाधिकारी यांच्यामध्ये  कार्याध्यक्षपदी बाळासाहेब पांडे, उपाध्यक्षपदी तुकाराम सावंत व रवींद्र कुलकर्णी, सचिवपदी अनिल पाटील धमने, सहसचिवपदी सुरेश आंबटवार, कोषाध्यक्षपदी सूर्यकुमार यन्नावार,  महानगराध्यक्षपदी नागोराव भांगे पाटील, जिल्हा संघटकपदी ऋषिकेश कोंडेकर,  सहसंघटकपदी ज्योती सरपाते, जिल्हा कार्यकारिणीपदी मनोज बुंदेले, श्रीधर नागापूरकर, एस.एम.मुदखेडकर, शरद काटकर, सुनील जोशी, भगवान सूर्यवंशी, प्रवीणकुमार सेलुकर, आनंद सावंत, राज्यपाल गायकवाड, सिद्धार्थ तलवारे, राजपाल चिखलीकर यांची निवड करण्यात आली. गेल्या एक महिन्यापासून व्हॉईस ऑफ मीडियाच्या नांदेड जिल्हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता या निवडणुकीमुळे नांदेड जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारणी बरखास्त झाली होती. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी भारतामधल्या संपूर्ण राज्याच्या निवडणुका होणार असे जाहीर केले होते, त्यानुसार सर्वप्रथम प्रदेश कार्यकारिणीची निवडणूक संपन्न झाली होती, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथमच जिल्हा कार्यकारणीच्या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्याने प्रथम क्रमांक मारून ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. एकूण 82 टक्के मतदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवारांना पसंती क्रमांक १ ते २१ असे क्रम देऊन मतदान केले. 

ही मतदान प्रक्रिया सुरळीत राबविण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ व सीए सुरेश शेळके यांनी काम पाहिले. 

नांदेड जिल्ह्याच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, सरचिटणीस दिगंबर महाले, कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, विजय चोरडिया, मंगेश खाटीक व  मराठवाडा विभागीय अध्यक्ष सतीश रेंगेपाटील यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.