फैजपूर येथील जे.टी.इंजीनियरिंग कॉलेजमध्ये दोन दिवसीय "व्यक्तिमत्व विकास आणि आत्ममूल्यांकन" या विषयावर कार्यशाळा
फैजपूर येथील जे.टी.इंजीनियरिंग कॉलेजमध्ये दोन दिवसीय "व्यक्तिमत्व विकास आणि आत्ममूल्यांकन" या विषयावर कार्यशाळा
लेवाजगत न्यूज फैजपूर -येथील जे.टी.इंजीनियरिंग कॉलेजमध्ये एज्युकेशनल रिसर्च अँड रुरल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तसेच जीवन संजीवनी मानव संशोधन व विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय "व्यक्तिमत्व विकास आणि आत्ममूल्यांकन" या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत विभागीय प्रकल्प अधिकारी एजाज एम शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के..जी.पाटील यांनी एजाज शेख सरांची ओळख करून कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले.
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास यावर मार्गदर्शन करताना एजाज शेख यांनी माणसे घडविली जातात तो देश प्रगतीपथावर असतो. आजचे युग स्पर्धात्मक आहे, स्वतःच्या गुणांवर लक्ष द्या. चांगले कपडे घालून, चांगले बोलून व्यक्तिमत्व घडत नाही,तर त्यासाठी सुप्त गुणांना वाव द्यायला हवा. अभिव्यक्ती चांगली असल्यास अध्यापनही चांगले करता येऊ शकते. शरीराची भाषा व तुमचा आवाज यावरही व्यक्तिमत्व अवलंबून असते. तुमच्यातील क्षमता ओळखा. तुमच्या ज्ञानाचा समाजासाठी उपयोग करा असे प्रतिपादन केले.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व मापन करण्यासाठी आत्ममल्यांकन एका टेस्टच्या माध्यमातून केले. आत्म मूल्यांकन करताना आत्मप्रतिमा, महत्वकांक्षा, आत्मविश्वास, निर्णयशक्ती, सर्जनशीलता, अभिव्यक्ती, विधायक वृत्ती, एकाग्रता, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक आरोग्य, भावनिक सुरक्षितता या गुणवैशिष्ट्यांचे मापन करून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व तपासले.
याप्रसंगी प्र.प्राचार्य डॉ.के.जी. पाटील, उपप्राचार्य डॉ.जी.ई. चौधरी, प्रा वाय आर भोळे, प्रा.एम. डी.पाटील तसेच प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत