Header Ads

Header ADS

"तुतारी वाजवणारा माणूस"या निशाणीवर मतदान केल्यास दोन आमदार निवडणार-ॲड.रोहिणी खडसे

Trumpet-playing-man-will-elect-two-MLAs-ad-Rohini-Khadse if-voted-on-target


 "तुतारी वाजवणारा माणूस"या निशाणीवर मतदान केल्यास दोन आमदार निवडणार-ॲड.रोहिणी खडसे

लेवाजगत न्यूज बोदवड-इतर मतदारसंघांमध्ये एक आमदार निवडला जातो, पण मुक्ताईनगरात तुम्ही "तुतारी वाजवणारा माणूस" या निशाणीला मतदान करून दोन आमदार निवडणार आहात, असे प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी बोदवड येथील सभेत केले. तुमच्या मताने महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि सरकार आल्यानंतर रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांना विधानपरिषदेचे आमदार बनवण्याचे वचन पक्षश्रेष्ठींनी दिले आहे. 

     मुक्ताईनगर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ बोदवड येथील गांधी चौकात माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, ज्येष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल, विशाल खोले महाराज यांच्या उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ॲड. रोहिणी खडसे म्हणाल्या  की, बोदवड तालुक्याने कायम शरद पवार साहेबांवर निष्ठेने प्रेम केले आहे. हे प्रेम कायम ठेवा, हीच माझी विनंती आहे. 

    राज्यात महायुतीचे सरकार असताना शेतकरी, कामगार, आणि सामान्य जनतेच्या हिताच्या विरोधात निर्णय घेतले जात आहेत. हे सरकार बदलून महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी शरद पवार साहेब राज्यभर प्रचार सभा घेत आहेत. त्यामुळे तुमचे एक एक मत महत्त्वाचे आहे. तुमच्या मतदानाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल आणि सरकार आल्यानंतर ज्येष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटिल यांना विधानपरिषद वर आमदार बनवण्याचे आश्वासन पक्षाच्या वरिष्ठांनी दिले आहे.


या निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय साधण्यासाठी आपण तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीला मतदान करण्याची विनंती केली. वर्तमान आमदारांनी मागील निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत, शेतकरी, कामगार, आणि तरुणांच्या प्रश्नांवर विधानसभेत आवाज उठवला नाही. 


शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी शंभर वेळा अटक व्हायला तयार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे म्हणजे गुन्हा नाही. या संदर्भात विरोधकांनी त्यांच्या विरोधात प्रचार पत्रके छापली आहेत, ज्यात फक्त "रोहिणी खडसे पोलिसांच्या ताब्यात" ही हेडलाइन वापरली गेली आहे, परंतु संपूर्ण बातमी नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना मी अटक झाली, याचा मला अभिमान आहे.

     यावेळी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे , रविंद्र भैय्यासाहेब पाटिल , विशाल खोले महाराज,डॉ सुधिर पाटिल, दिपक झांबड, ॲड मनोहर खैरनार, डॉ जगदिश पाटिल यांनी उच्चशिक्षित सुसंस्कृत ॲड रोहिणी खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.