विद्यार्थी दशेपासूनच स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन आवश्यक चिनावल येथील स्नेहमेळाव्यात अमोल गर्जे यांचे प्रतिपादन
विद्यार्थी दशेपासूनच स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन आवश्यक चिनावल येथील स्नेहमेळाव्यात अमोल गर्जे यांचे प्रतिपादन
लेवाजगत न्यूज चिनावल ता रावेर-येथील नूतन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील सन २००२ आणि सन २००४ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा राजेंद्र फालक यांच्या वाड्यात संपन्न झाला. या प्रसंगी या कार्यक्रमास सुमारे ८० मित्र मैत्रिणी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास सावदा पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांची उपस्थिती लाभली. प्रसंगी त्यांनी उपस्थित जमलेल्या विद्यार्थ्यांना मोलाचे असे मार्गदर्शन केले. सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने आणि आपल्या ग्रामीण भागात विद्यार्थ्याना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने ते स्पर्धेच्या युगात मागे पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी उपस्थित पालकांना माध्यमिक दशे पासूनच विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षांची माहिती देऊन त्यांना त्या परीक्षेसाठी मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. याच बरोबर जीवनात मैत्रीचे महत्व किती महत्वाचे आहे हे उदाहरण देखील पटवून दिले.
गणपती पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. बॅच मधील मुंबई पोलीस दलात पो उ नि असलेले ललित वरकडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रसंगी जे विदयार्थी मित्र अकाली निधनाने हे जग सोडून गेले आणि जे माजी शिक्षक आता हयात नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याच बरोबर कृषी सेवेमध्ये उच्च पदावर असलेल्या डॉ.नटेश टोके यांनी मैत्री आणि जीवनातील चढ उतार यावर आपले विचार प्रगट केले. तसेच या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांकडून गावविकासासाठी काय करता येईल याविषयी चर्चा करण्यात आली आणि गरजू लोकांसाठी आवश्यक त्या वस्तू देण्याचे ठरविण्यात आले. सर्वांनी आपली ओळख , व्यवसाय याची माहिती दिली. तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी चिनावल येथील पोलिस पाटील पदावर असलेले निलेश नेमाडे , सिंचन नेहेते , विशाल खारे, योगेश कोळंबे , अतुल धांडे, चेतन नेमाडे , सूरज नारखेडे, प्रवीण राणे , प्रकाश जोशी , यांचे अनमोल सहकार्य लाभले.
विद्यार्थी दशेत ज्या प्रमाणे राहत होतो त्याच प्रमाणे सर्वांनी याचा आनंद लुटला. संगीत खुर्ची स्पर्धा यावेळेस घेण्यात आली. त्यामुळे परत २२ वर्षांनी सर्वांना शाळेय जीवनात परत जाता आले. भरीत पूरी या भोजनाचा आनंद लुटत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावना पाटील (सरोदे) तर आभार प्रा योगेश कोष्टी यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत