Header Ads

Header ADS

श्रीनगरमधील ‘संडे मार्केट’मध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, सहा जण जखमी

 

Śrīnagaramadhīla-saṇḍē-mārkēṭa-madhyē-dahaśatavādyāṅkaḍūna-grēnēḍa-hallā-6-jaṇa-jakhamī

श्रीनगरमधील ‘संडे मार्केट’मध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, सहा जण जखमी

वृत्तसंस्था जम्मू-काश्मीर-च्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मोठा हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी रविवारी (३ नोव्हेंबर) दुपारी एका बाजारात गर्दीच्या वेळी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात सहा नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेलं असून तिथे त्यांच्यावर उपाचर चालू आहेत. दरम्यान, संरक्षण दलाने घटनास्थळ व आसपासच्या भागात शोधमोहीम हाती घेतली आहे. तसेच श्रीनगरमधील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

   या घटनेची माहिती देताना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की दहशतवाद्यांनी टीआरसीजवळ तुफान गर्दी असलेल्या बाजारपेठेत ग्रेनेड फेकले. ज्यामुळे गोंधळ झाला. लोक सैरावैरा धावू लागले. या हल्ल्यात सहापेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला होता. मात्र अद्याप हल्लेखोरांपैकी कोणीही पोलिसांच्या अथवा सुरक्षा दलांच्या हाती लागलेला नाही. या हल्ल्याशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.