अभ्यासू, शांत, संयमी नेतृत्व हव की गुंडागर्दी आणि केवळ परंपरा सांगणार हवं-अमोल जावळे
अभ्यासू, शांत, संयमी नेतृत्व हव की गुंडागर्दी आणि केवळ परंपरा सांगणार हवं-अमोल जावळे
प्रतिनिधी यावल -रावेर विधानसभा मतदारसंघात बाहेरून येऊन गुंडागर्दी करणारे आणि एकेकाळी हद्दपार झालेले काही लोक निवडणुकीत उतरले आहेत, तर दुसरे उमेदवार केवळ वडिलांची परंपरा सांगून, कोणतेही स्वकर्तृत्व नसताना मत मागत आहेत. पण मी मतदारसंघाचा सखोल अभ्यास केला असून येथे कोणत्या विकासकामांची आवश्यकता आहे, याची मला जाण आहे. राज्यात महायुतीचेच सरकार येणार आहे, आणि माझा विजय निश्चित आहे. या विश्वासासह मी मतदारसंघात नव्या विकासाची मुहूर्तमेढ रोवणार आहे, असे महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांनी सांगितले. कठोरा, विरोदा, पिंपरूड आणि अन्य गावांमध्ये त्यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
प्रचारादरम्यान अमोल जावळे यांचे गावोगावी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले, आणि मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते, तर ज्येष्ठ मतदारांनी आशीर्वाद दिले. जावळे म्हणाले की, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आमदार होण्याची स्वप्ने पाहत आहेत, पण ती पूर्ण होणार नाहीत. जनता सुज्ञ आहे आणि केवळ परंपरेच्या नावावर मत मागणाऱ्यांनाही यश मिळणार नाही. "मला एकदा संधी देऊन बघा, विकास काय असतो ते दाखवून देईन," असे त्यांनी सांगितले. रावेरच्या जनतेने इतिहासात कधीही आमदाराला पुन्हा निवडून दिले नाही, त्यामुळे यावेळी मतदारसंघात बदल होणार असून, जनतेची मला साथ मिळेल, हा आत्मविश्वास आहे, असे जावळे यांनी सांगितले.
प्रचारात हिरालाल चौधरी, हर्षल पाटील, उमेश पाटील, सविता भालेराव, जयश्री चौधरी, पुरोजित चौधरी, पांडुरंग सराफ, सागर कोळी, तेजस पाटील, योगराज बऱ्हाटे, शाम महाजन, भरत पाटील, विलास कोळी, रामा कोळी, पंकज मोरे, अक्षय चौधरी, अमोल वारके, चेतन राणे, प्रकाश चौधरी, सतीश चौधरी, वसीम पिंजारी, योसेफ चौधरी यांसह महायुतीचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत