सत्तार यांच्या प्रचारावर भाजपचा बहिष्कार शहराध्यक्षांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र
सत्तार यांच्या प्रचारावर भाजपचा बहिष्कार शहराध्यक्षांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र
लेवाजगत न्यूज छत्रपती संभाजीनगर :-अब्दुल सत्तार नेहमी भाजप संपविण्याची केवळ भाषाच करतात असे नाही तर तसे मतदारसंघात वागतात. हिंदू देवतांना शिव्या देतात, लोकांच्या जमिनी हडपण्यापासून ते बहुजन समाजाच्या मुलांवर खोटे गुन्हे लादेपर्यंत त्यांची मजल गेल्याने भाजपचा कार्यकर्ता म्हणून महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारावर बहिष्कार टाकत असल्याचे पत्र भाजपचे सिल्लोडचे शहराध्यक्ष कमलेश कटियार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना लिहिले आहे.
भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचा आणि सत्तार यांच्यामधील वादाचा पुढचा अंक म्हणून या पत्राकडे पाहिले जात आहे. कमलेश कटियार यांनी पत्रात नमूद केले आहे की, भाजपचे धोरण प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी मी असे आहे. त्या सूत्रातही सत्तार हे विश्वासू वाटत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रचारावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शहराध्यक्ष या नात्याने भाजप वाढविण्याचे काम मी करत राहीन, पण सत्तार यांचा प्रचार करणार नाही. सत्तार यांची मतदारसंघात दहशत आहे. त्यांच्याकडून खंडणी मागितली जाते, असे गंभीर आरोप कटियार यांनी केले आहेत. सत्तार यांच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बाजूने उतरल्याचे दिसून येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत