केळी प्रक्रिया उद्योग रावेर यावल परिसरात उभारणार :धनंजय चौधरी
रावेर यावल परिसरात केळी प्रक्रिया उद्योग उभारणार-धनंजय चौधरी
लेवाजगत न्यूज शाम पाटील-रावेर, यावल हा परिसर केळी उत्पादक शेतकऱ्यांचा आहेत. पण, केळीवर प्रक्रिया करणारे फारसे उद्योग नाही. यामुळे केळीला अपेक्षित भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकऱ्यांना यातून दिलासा देण्यासाठी रावेर मतदार संघात ठिकठिकाणी केळी प्रक्रिया उद्योग उभारू, अशी ग्वाही रावेर मतदार संघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी दिली.
रावेर मतदार संघात प्रचार करताना त्यांनी केळी उत्पादक शेतकरी व मतदारांशी संवाद साधला. त्यावेळी शेतकऱ्यांनी केळीचे प्रश्न मांडले. प्रचार दौऱ्यात कळमोदा येथील प्रमोद बोंडे, प्रशांत जावळे, सरपंच राजू तडवी, उपसरपंच रहमान तडवी, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप वाघ, हेमंत जावळे, फकिरा तडवी, बिस्मिल्ला तडवी, भरत कुवर, हमीद तडवी, दगडू सुभान तडवी, उस्मान तडवी, हुसेन तडवी, सुभेदार तडवी, फिरोज तडवी,मेहबूब तडवी, डॉ. भावेश जावळे, न्हावी येथील सरपंच देवेंद्र चोपडे, प्रा. एम टी फिरके, नीळकंठ फिरके, रमेश महाजन, गुणवंत टोंगले, सुनील फिरके, संगम फिरके, भानुदास चोपडे, विलास चौधरी, नितीन इंगळे, चेतन इंगळे, देवेंद्र चौधरी, मधुकर झोपे, नेमिदास भंगाळे, सरफराज तडवी, नदीम पिंजारी, सुनील वाघुळदे, भूषण फिरके, विश्वनाथ तायडे, सिद्धार्थ तायडे, किशोर पाटील, शांताराम मोरे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत