Header Ads

Header ADS

पाडळासा येथे महिला भजनी मंडळातर्फे टाळ चिपळयांच्या गजरात स्वागत थोरामोठ्यांचा धनंजय चौधरींवर आशीर्वादाचा वर्षाव

 

Padalasa-Here-Women-Bhajani-Mandal-Shoot-Welcome-to-Gujarat-of-Chipalas-Thoramothis-Rain-of-Blessings-On-Dhananjay-Chaudhary

पाडळासा येथे महिला भजनी मंडळातर्फे टाळ चिपळयांच्या गजरात स्वागत 

थोरामोठ्यांचा धनंजय चौधरींवर आशीर्वादाचा वर्षाव 

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-यावल-विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. अधिकाधिक मतदारांच्या भेटी घेवून त्यांच्याशी विविध विषयावर संवाद साधण्याचा या काळात प्रयत्न केला आहे. विकासाची दूरदृष्टी असलेल्या धनंजय चौधरींनी रविवारी यावल तालुक्यातील भोरटेक, पाडळसा, बामनोद, डोंगरकठोरा, सातोद, कोळवद व यावल येथे प्रचार दौरा करीत मतदारांशी संवाद साधला. पडळासा येथे महिला भजनी मंडळाने टाळ चिपाळ्यांच्या गजरात उमेदवार धनंजय चौधरींचे केलेले स्वागत लक्षवेधी ठरले. प्रचार फेरी दरम्यान भोरटेक व पाडळसा येथे थोरामोठ्यांनी उमेदवार चौधरींवर आशीर्वादाचा वर्षाव केला. 

रावेर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी प्रचार दौऱ्यात मतदारांच्या भेटींवर अधिकाधिक भर दिला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारावर टीका करण्यापेक्षा मतदारांशी सुसंवाद साधत भावी काळात मतदार संघात करावयाच्या विकास कामाबाबत चर्चा केली. मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासह नवीन योजना राबविण्याचा निर्धार धनंजय चौधरींनी ठिकठिकाणी प्रचार दौऱ्यात मतदारांच्या भेटीत व्यक्त केला आहे. महिला, युवक, बेरोजगार, शेतकरी, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, व इतर समाजासाठी विधायक दृष्टिकोनातून विकास कामे करण्यावर आपला भावी काळात भर राहणार असल्याचे त्यांनी प्रचार दौऱ्यात संवाद साधताना सांगितले. ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण करण्यात आले. संत महर्षी वाल्मिक व संत भीमा भोई यांच्या प्रतिमेचे तसेच गावातील मंदिरे, धार्मिक स्थळांचे दर्शन घेतले. यावेळी थोरामोठ्यांनी उमेदवारावर आशीर्वादाचा वर्षाव करीत प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आश्वासन दिले. उमेदवार धनंजय चौधरी यांचे महिला भजनी मंडळाने टाळचिपळयांच्या गजरात स्वागत केले. रामसीता महिला भजनी मंडळ राम मंदिरच्या सदस्या सुनंदा चौधरी, मालतीबाई चौधरी, सुशीला भारंबे, शैला चौधरी, नयना चौधरी, ज्योती नेहते, विठ्ठल रुक्मिणी महिला मंडळच्या सदस्या नलिनी झोपे, अलका ब-हाटे, ज्योती बेंडाळे, कविता ब-हाटे, उषा ब-हाटे, सिंधू नेहते, उषा ब-हाटे, पल्लवी ब-हाटे, मीनल ब-हाटे, सिंधू ब-हाटे, सिंधू नेहते, प्रतिभा झोपे, प्रतिभा राऊत, वृषाली झोपे, सरला झोपे, सोनी ब-हाटे, वैशाली ब-हाटे, रोहिणी ब-हाटे, नंदा फिरके यांच्यासह महिला सहभागी होत्या. यावल तालुक्यातील प्रचार दौऱ्यात त्यांच्यासोबत यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य यावल धनुभाऊ ब-हाटे, सरपंच सुरज पाटील, माजी सरपंच यशवंत ब-हाटे, ग्रामीण शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. उदय चौधरी, विजय पाटील, सिताराम कोळी, बापू कोळी, अरुण चौधरी, राजू पठाण, ज्ञानदेव बेंडाळे, शेखर तायडे, राजू बेंडाळे, भोरटेक येथील विजय कोळी, शामराव कोळी, विनोद कोळी, भूषण कोळी, जितेंद्र कोळी, किशोर कोळी, सचिन कोळी, दीपक कोळी, रवींद्र कोळी, रामचंद्र कोळी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी , कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.