ना.रक्षा खडसे यांचे अमोल जावळे यांच्या प्रचारार्थ यावल तालुक्यात गावागावात महायुतीला विजयी करण्याचे आवाहन
ना.रक्षा खडसे यांचे अमोल जावळे यांच्या प्रचारार्थ यावल तालुक्यात गावागावात महायुतीला विजयी करण्याचे आवाहन
लेवा जगत न्यूज सावदा (श्याम पाटील)-रावेर विधानसभा भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची बामणोद, अट्रावल, सांगवी, डोंगर कठोरा इ. गांवाना भेट दिली. यावेळी त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ अनुषंगाने रावेर लोकसभा अंतर्गत रावेर विधानसभा साठी भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावल तालुक्यातील बामणोद, अट्रावल, सांगवी, डोंगर कठोरा इ. गांवात भेट देऊन, मतदारांशी प्रत्येक्ष संवाद साधला व त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी महायुती उमेदवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत