मुक्ताईनगर मतदारसंघ गोळीबार प्रकरण दोघांना अटक !कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याचे निष्पन्न !!
मुक्ताईनगर मतदारसंघ गोळीबार प्रकरण दोघांना अटक !कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याचे निष्पन्न !!
लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर- मतदार संघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांचेवर झालेल्या गोळीवार संदर्भात बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याच्या अवघ्या काही तासात पोलिसांनी घटनेचा मागोवा घेत गुन्ह्याचा छडा लावला असून यात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याचे निष्पन्न झाल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या प्रेस नोट म्हटले असून अटकेतील आरोपींकडून घटने संदर्भात आणखी काही खुलासे होणार का ? उमेदवारावर हल्लेखोरांनी नेमका कोणत्या कारणाने हल्ला केला ? याचा पूर्ण खुलासा व्हावा अशी जनतेला अपेक्षा लागली असून वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासात गुन्ह्याचा छडा लावल्याने सर्वच स्तरातून पोलिसांचे कौतिक होत आहे.
पोलिसांनी प्रसिद्धी दिलेल्या प्रेस नोट नुसार ,
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात विनोद नामदेव सोनवणे रा. खामखेडा ता. मुक्ताईनगर हे मतदार संघातून अपक्ष निवडणुक लढवित असुन ते दिनांक ५ रोजी दुपारी २वाजून ३५ मिनिटाच्या सुमारास राजुर तालूका बोदवड गांवी राजुर ते नांदगांव कडे जाणारे फाट्यावर प्रचार रॅली करीत असतांना ते बसलेल्या इंडीव्हर गाडी क्रमांक एम एच १९ सिएफ ११९१ हिचे दिशेने अज्ञात आरोपी यांनी सुमारे १० ते १५ फुट अंतरावरुन समोरुन फिर्यादी व साक्षीदार यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने दोन गोळ्या गाडीचे दिशेने फायर करुन पळून गेलेत म्हणुन अजय राजेंद्र बंगाळे वय २७ व्यवसाय चालक रा. रुईखेडा ता. मुक्ताईनगर यांचे फिर्यादीवरुन बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अरविंद भोळे करीत आहेत.
यातील आरोपी यांची पोलीसांनी गोपनिय माहिती काढुन तपास पथके तयार करुन गोपनिय माहितीच्या आधारे दिपक दादाराव शेजोळे वय २२ रा. येवती ता. बोदवड व आयुष उर्फ चिकु गणेश पालवे वय १९ रा. नांदगाव ता. बोदवड यांना अटक करण्यात आली असुन त्यांचेकडुन गुन्ह्यात वापरलेलो मोटार सायकल गावठी कट्टा व काडतुस जप्त करण्यात आला आहे. सदर घटनेत कोणतीही राजकीय पार्श्वभुमी नसल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्ह्याचा सखोल तपास सुरु आहे.असे जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक, कार्यालय, जळगाव यांनी प्रेस नोट द्वारे कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत