Header Ads

Header ADS

विकासासाठी मविआच्या उमेदवारांना विजयी करा खासदार इम्रान प्रतापगढी यांचे सभेत आवाहन मराठा महासंघ व राष्ट्रीय दलित पँथरचा पाठिंबा

 

Make-Maviya's-candidates-victory-for-development-Khasdar-Imran-Pratapgarhi-calls-for-support-of-Maratha-Confederation-and-National-Dalit-Panther-in-the-meeting.

विकासासाठी मविआच्या उमेदवारांना विजयी करा खासदार इम्रान प्रतापगढी यांचे सभेत आवाहन

मराठा महासंघ व राष्ट्रीय दलित पँथरचा पाठिंबा

लेवाजगत न्यूज शाम पाटील फैजपूर-महायुतीच्या काळात राज्याचा विकास खुंटला आहे. आता अपक्ष उमेदवार उभे करून महायुतीतर्फे मत विभाजनाचा प्रकार करण्यात येत आहे. त्यामुळे मतदारांनी सावध राहून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी ताकद उभी करावी, असे आवाहन प्रसिद्ध शायर तथा खासदार इम्रान प्रतापगढी यांनी केले. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचारार्थ फैजपूर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. जळगावचे करीम सालार यांनी खासदार प्रतापगढी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. फैजपूर येथील फार्मसी कॉलेजजवळ झालेल्या सभेच्या व्यासपीठावर उमेदवार धनंजय चौधरी, चोपड्याचे उमेदवार प्रभाकर सोनवणे, आमदार शिरीष चौधरी, हरियाणाचे भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दीपक लांबा, जम्मू काश्मीरच्या साइमा जान, इनायत उल्लाखान, काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे, हारून नदवी, माजी आमदार रमेश चौधरी, करीम सालार, मुकुंद सपकाळे, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,राष्ट्रवादीचे रावेर तालुकाध्यक्ष किशोर पाटील, काँग्रेसचे यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, काँग्रेसचे रावेर तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष हरिष गणवाणी, फैजपूरचे कुर्बान शेख, शब्बीर शेख, प्रल्हाद बोंडे, रोझोद्याचे रमेश महाजन, योगिता वानखेडे, मानसी पवार, योगेश पाटील, राजू तडवी, सुनील कोंडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जम्मू काश्मीर येथून आलेल्या साइमा जान, इनायत उल्लाखान, हारून नदवी, करीम सालार, प्रतिभा शिंदे, मुकुंद सपकाळे, ज्ञानेश्वर बढे यांनी सभेला संबोधित केले. सूत्रसंचालन नेहा चौधरी यांनी केले.

   मराठा महासंघ व राष्ट्रीय दलित पँथरचा पाठिंबा

     गत काळात आमदार शिरीष चौधरी यांचे काम व समाज विकासासाठी केलेले प्रयत्न यामुळे धनंजय चौधरी यांचे हात बळकट करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाची रावेर व यावल शाखा, राष्ट्रीय दलित पँथरने पाठिंबा दिला. संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भालेराव यांच्या आदेशावरून पँथरने पत्र दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.