महायुतीचे उमेदवार अमोल जावळेंना जनतेचा उदंड प्रतिसाद विजयाचा ठाम विश्वास
महायुतीचे उमेदवार अमोल जावळेंना जनतेचा उदंड प्रतिसाद विजयाचा ठाम विश्वास
प्रतिनिधी यावल -रावेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांनी यावल तालुक्यातील चितोडा, डोंगरकठोरा, सांगवी, बोरखेडा, हिंगोणा, न्हावी, मारुळ, आणि बोरखेडा या गावांमध्ये दौरा करून नागरिकांशी थेट संवाद साधला. या संवाद दौऱ्यात नागरिकांचा प्रचंड उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद, तसेच मिळणाऱ्या प्रेमाच्या वर्षावामुळे अमोल जावळेंना आगामी निवडणुकीत विजयाचा ठाम विश्वास आहे.
अमोल जावळे यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी महायुती सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. गावागावातून आलेल्या नागरिकांनी, युवकांनी, ज्येष्ठांनी आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अमोल जावळेंना पाठिंबा दिला व मतदानाच्या माध्यमातून महायुतीला विजय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
दौऱ्यात हिरालाल चौधरी, शरद महाजन, नितीन चौधरी, नरेंद्र नारखेडे, बन्सीलाल गुजर, हर्षल पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, उमेश बेंडाळे, सविता भालेराव, राकेश फेगडे, यशवंत तळेले, प्रवीण वारके, जयश्री चौधरी, उमेश पाटील, किशोर कोलते, पंकज चौधरी, अतुल भालेराव, योगराज बऱ्हाटे यांच्यासह महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यांनी या दौऱ्यात जावळेंना भक्कम विजयाची खात्री दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत