लेवा पाटील महामंडळ कागदावरच जळगावात मविआचे नेते एकनाथ खडसेंचा महायुतीच्या सरकारवर प्रहार
लेवा पाटील महामंडळ कागदावरच जळगावात मविआचे नेते एकनाथ खडसेंचा महायुतीच्या सरकारवर प्रहार
लेवाजगत न्यूज प्रतिनिधी जळगाव-लेवा पाटील, गुजर समाज महामंडळ, केळी महामंडळाच्या केवळ घोषणाच आहेत.
कायदा-सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली असून, सरकार गुंडांना संरक्षण पुरवते आहे. जो माणूस विरोधात जातो त्याचा निधी रोखण्याचे पाप हे सरकार करते आहे अशा शब्दात महाविकास आघाडीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी महायुती सरकारवर खडकून टीका केली.
शहर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनील महाजन यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सुभाष चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. सभेत सुरुवातीला मुकुंद सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. शहरात सिव्हिल हॉस्पिटलसमोर असलेल्या जागेवरील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुद्ध यांचा पुतळा हटवण्याचे षड्यंत्र रचणारे भाजपचे मंत्री आणि चाळीसगावचे आमदार यांच्या उमेदवाराला ठरवून पाडा असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर अयाजभाई नियाज, भारतीय कामगार संघटना व दलित पँथरचे राजेश सोनवणे, काँग्रेसचे श्याम तायडे, आरपीआयचे जे.डी.भालेराव यांनी मनोगते व्यक्त केली. शहर विकासाला १०० कोटी आले, या शहराला सिंगापूर करण्याची स्वप्न दाखवली गेली. निवडणुका आल्या योजना जाहीर करायची. पण आलेले पैसे कुठे जिरतात हे काय जनतेला कळत नाही का? असे खडसे या सभेत म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत