जळगावात मोकाट कुत्र्यांचा वृद्ध महिलेवर हल्ला
जळगावात मोकाट कुत्र्यांचा वृद्ध महिलेवर हल्ला
लेवाजगत न्युज जळगाव:- शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून आज शनिवारी दि. १६ नोव्हेंबर रोजी दुपारी एका वृद्ध महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवून जबर जखमी केले आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झालेले आहे. तात्काळ कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मंजुळा गोपाळ साळी (वय ८०) ह्या वृद्ध महिला त्यांचे कानळदा रोड वरील हरी ओम नगरात शनिवारी दि. १६ रोजी दुपारी उभ्या होत्या. तेव्हा अचानक काही भटकी कुत्री आली. (केएन) त्यानी मंजुळा साळी यांच्यावर हल्ला चढवून चेहरा, हात, पाय आदी ठिकाणी चावे घेऊन त्यांना जबर जखमी केले. नागरिकांनी तत्काळ कुत्र्यांना हाकलून मंजुळा साळी यांना सोडविले
नंतर कुटुंबीय व नागरिकांनी त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी उपचार केले असून कक्षात दाखल करून घेण्यात आले आहे. (केएन) दरम्यान, "केसरीराज" शी बोलताना योगेश साळी यांनी सांगितले की, महानगरपालिकेकडे मागे अनेक वेळा वॉर्डातील नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा म्हणून सांगितले आहे. मात्र त्यावर कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे आमच्या मंजुळा आजी वर प्राणघातक प्रसंग आला आहे. तत्काळ कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही तर नागरिक आंदोलनाला देखील उतरतील, असेही योगेश साळी म्हणाले.
दरम्यान याच भागात राहाणा-या चार ते पाच जणांना परत कुत्र्यांनी चावा घेतल्याने रात्री ९ वाजता शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यामुळे परिसरात कुत्र्यांनी नागरीकांनवर हल्ला करत असुन महानगर पालिका प्रशासन दखल घ्यावी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत