जळगावात घरगुती गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट दहा जण गंभीर भाजले
जळगावात घरगुती गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट दहा जण गंभीर भाजले
लेवाजगत न्युज जळगाव :- येथील इच्छादेवी चौकात चारचाकी वाहनात घरगुती गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट होऊन दहा जण गंभीर भाजले. (Jalgaon) यात एकाच कुटूंबातील सात जणांचा समावेश असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना मंगळवारी दुपारी साडे ४ वाजता इच्छा देवी चौकात घडली. एमआयडीसी(midc police) पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते. ऐन राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या या दुकानाला गॅस भरण्याची परवानगी कशी मिळाली हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
पुण्यातील दालवाले कुटूंब मंगळवारी दुपारी कुटूंबासह अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यांनी यावेळी चारचाकी वाहन भाड्याने घेतले. इच्छादेवी चौकात गॅस भरत असतानाच अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. काही कळण्याच्या आतच वाहनानेही पेट घेतला.
वाहनातील दालवाले कुटूंबातील सात जणांसह कारचालक संदीप सोपान शेजवळ (वय ४५, रा. वाघ नगर) तसेच दानिश अनिस शेख व शेजारील टायर पंक्चर दुकानदार आरिफ अहमद अब्दुल शेख रहेमान (वय ४०, रा. तांबापुरा) हे दोघं जण भाजले गेले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.(jalgaon news)
या घटनेत एकाच कुटुंबातील भरत सोमनाथ दालवाले (वय ४०, रा. भवानी पेठ, जळगाव), देवेश भरत दालवाले (वय १८), सूरज भरत दालवाले (वय २०), प्रतिभा भरत दालवाले (वय ३५), हेमा दालवाले, संजय दालवाले (वय ४५, रा.पुणे), लक्ष्मी संजय दालवाले (रा. पुणे) हे भाजले गेले आहेत. वाहनात गॅस भरला जात असताना आरिफ शेख दुकानात टायरचे पंक्चर काढत होते.
त्याच वेळी सिलिंडरचा स्फोट होऊन जोराचा आवाज झाला. हा आवाज पाहून बाहेर आल्यावर आगीच्या ज्वाळात ते भाजले. या आगीत बुलेटसह चारचाकी वाहन, गॅस भरण्याचे दुकान तसेच टायर पंक्चरचे दुकान व कॉम्प्रेसर जळून खाक झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत