Header Ads

Header ADS

लेवा समाजाच्या मेळाव्यात २०० मुलींसह 300 मुलांचा परिचय, विदेशातून उपस्थिती

लेवा समाजाच्या मेळाव्यात २०० मुलींसह 300 मुलांचा परिचय, विदेशातून उपस्थिती


लेवा समाजाच्या मेळाव्यात २०० मुलींसह 300 मुलांचा परिचय, विदेशातून उपस्थिती

लेवाजगत न्यूज जळगाव -येथिल लेवा नवयुवक संघातर्फे रविवारी एमआयडीसीतील म्हाडा कॉलनी समोरील माधुरी वेअर हाऊस येथे लेवा पाटीदार समाजाचा विश्वस्तरीय विवाहेच्छुक वधू-वर परिचय महामेळावा घेण्यात आला. आठ हजारांवर समाजबांधव उपस्थित होते. मेळाव्यात २०० मुली व ३०० मुले अशा ५०० विवाहेच्छुकांनी परिचय करून दिला. बहुतांश युवक-युवतींनी आपला जोडीदार उच्चशिक्षित, कुटुंबवत्सल, नोकरदारसह अनुरूप असावा अशा अपेक्षा व्यक्त केल्या. विवाहेच्छुकांना आवडीचा जोडीदार मिळावा व विवाह संस्था टिकून राहावी या उद्देशाने ३५ वर्षांपासून लेवा नवयुवक संघातर्फे विवाहेच्छुक वर-वधूंचा परिचय मेळावा घेण्यात येत आहे. या महामेळाव्यात समाजबांधवांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरासह संपूर्ण मंडपात स्पीकर,एलइडी, चहा, नाष्टा, मिनरल वॉटर, वधू-वर सूची पुस्तकाचे वाटप अशा सर्व सुविधा येथील एक लाख स्क्वेअरफूट जागेत लेवा नवयुवक संघातर्फे करण्यात आल्याहोत्या. परिचय मेळाव्यात शेतकरी, कष्टकरी, कामगारांसह शासकीय कर्मचारी, अधिकारी विवाहेच्छुक वधू-वरांचा समावेश होता. मेळाव्याच्या सुरुवातीला नेपाळयेथील बस दुर्घटनेतील लेवा पाटीदार समाजातील सर्व बांधवांना तसेच लेवा समाजाचे कुटुंबनायक कै. रमेश पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, अॅड. प्रकाश पाटील, दादा महाराज जोशी, डॉ. ए. जी. भंगाळे, लेवा नवयुवक संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी व समाजबांधव  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.