मुक्ताईनगर मधील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर हल्लेखोरांकडून गोळीबार
मुक्ताईनगर मधील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर हल्लेखोरांकडून गोळीबार
लेवाजगत न्युज मुक्ताईनगर:- विधान सभा मतदार संघासाठी अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांचा बोदवड तालुक्यातील राजूर गावात प्रचार रॅली सुरू असतांना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत अपक्ष म्हणून विनोद सोनवणे हे निवडणूकीच्या रिंगणात उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान, मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृती मारोती मंदीरात जावून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यानंतर त्याचा प्रचार दौर बोदवड तालुक्यात सुरू झाला.
बोदवड तालुक्यातील राजूर गावात विनोद सोनवणे यांची प्रचार रॅली सुरू असतांना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे बोदवड तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारमध्ये कुणालाही दुखापत झालेले नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत