सातपुड्यातील जंगलात असलेल्या आंबापाणी केंद्रावरजाण्यासाठी पहिल्यांदा चार चाकी वाहनाची व्यवस्था ७० किलोमीटरच्या प्रवासासाठी कर्मचारी रवाना
सातपुड्यातील जंगलात असलेल्या आंबापाणी केंद्रावरजाण्यासाठी पहिल्यांदा चार चाकी वाहनाची व्यवस्था
७० किलोमीटरच्या प्रवासासाठी कर्मचारी रवाना
लेवाजगत न्यूज जळगाव दि. १९( माध्यम कक्ष ) जिल्ह्यातील चोपडा मतदार संघातील आंबापाणी हे सातपुडयातील जंगलात येणारे मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर ३८४ मतदार आहेत . या पाड्यावर जाण्यासाठी यावेळी मतदान केंद्रावर ज्या आठ अधिकारी, कर्मचारी यांची सेवा देण्यात आली आहे. एक क्रूझर जीप आणि वन विभागाच्या गाडीसह ही टीम निघाली आहे .
गेल्या लोकसभेला मोटारसायकल वर ही टीम गेली होती. यावेळी या दोन वाहनातून चोपडा ते न्हावी, तिड्या, मोहमांडली, रुईखेडा मार्गे आंबापाणी असे ७० किलोमीटरचे अंतर पार करून ही टीम केंद्रावर पोहचणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत