Header Ads

Header ADS

धनंजय चौधरी यांचे मतदारांकडून पुष्पवृष्टीने स्वागत विजयी करण्याचे मतदारांनी दिले आश्वासन

Dhananjay Chaudhary welcomed by the voters with a shower of flowers, the voters assured him of victory.


धनंजय चौधरी यांचे मतदारांकडून पुष्पवृष्टीने स्वागत विजयी करण्याचे मतदारांनी दिले आश्वासन 

प्रतिनिधि रावेर-रावेर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी रावेर  तालुक्यातील भाटखेडा, उटखेडा, चिनावल, रोझोदा, विवरा खुर्द, विवरा बुद्रुक, निंभोरा, फैजपूर येथे प्रचार दौरा करीत मतदारांशी संवाद साधला. यावेळी प्रचार फेरीवर ठिकठिकाणी मतदारांनी उत्स्फूर्तपणे पुष्पवृष्टी करीत स्वागत केले. काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आश्वासन मतदारांनी यावेळी उमेदवार चौधरी यांना दिले. 

हे पण बघा-धनंजय शिरीष चौधरी महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ चिनावल येथे भव्य प्रचार रॅली

https://youtu.be/9xYHzFkWVN4

    विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. अधिकाधिक मतदारांच्या भेटी घेवून त्यांच्याशी विविध विषयावर संवाद साधण्याचा या काळात प्रयत्न केला आहे. विकासाची दूरदृष्टी असलेल्या धनंजय चौधरींचे प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करीत तर काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करीत मतदारांनी स्वागत केले. यावेळी विविध विषयांवर मतदारांशी उमेदवार धनंजय चौधरी यांनी संवाद साधला. कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, यशवंत धनके, माजी नगरसेवक योगेश गजरे, सोपान साहेबराव पाटील, यशवंत महाजन, महेश लोखंडे, महेंद्र गजरे, राजेंद्र पानपाटील लक्ष्मण मोपारी, आदिवासी नेते दिलरुबाब तडवी, गुलशान तडवी, भाटखेडा येथील रहिवासी व गायत्री आग्रोटेकचे संचालक गुलाब पाटील, निवृत्त शिक्षक हबीब तडवी, प्रतीक पाटील, सलीम तडवी, अशोक हिवरे, माजी सरपंच कैलास पाटील, डॉ. अनिल पाटील, राजेंद्र पाटील, अमोल पाटील, काशिनाथ कोळी, जगन्नाथ महाजन, अप्पा महाजन, सुरेश महाजन, बाळू माधव पाटील, बशीर तडवी, उटखेडा येथील सरपंच कुंदन महाजन, सदस्य सुधाकर पाटील, यशवंत महाजन, राकेश तायडे, सीताराम मिठाराम पाटील, माजी सरपंच शिवराम पाटील, ललित चौधरी, यासीन तडवी, संतोष महाजन, महेंद्र महाजन, अकिल तडवी, ईच्छाराम पाचपोळे, मोहन महाजन, बंडू चौधरी, साजिद तडवी, शहादात तडवी, पी. सी. पाटील,  श्याम महाराज, विनोद महाजन, गोकुळ पाटील, नरेंद्र पाटील, शालिक तायडे, छोटू सोनवणे, मुरलीधर तायडे, अमोल महाजन, वैभव पाटील, प्रवीण महाजन, प्रमोद महाजन, चिनावल येथील संजय महाजन, दामोदर महाजन, सुरेश गारसे, सुनील महाजन, किरण नेमाडे, सुनील फिरके, निखिल गारसे, चंद्रकांत भंगाळे, हयात खान, तहाद खान, श्रावण सवर्णे, शेख मुस्तकीन, किशोर बोरोले, नरेंद्र पाटील, प्रफुल्ल बोंडे, आकाश भंगाळे, बापू पाटील, रोझोदा येथील प्रगती विद्यालय अध्यक्ष रमेश महाजन, कामसिद्ध मंदिर रोझोदा अध्यक्ष विजय महाजन, माजी सरपंच दीपक सुधाकर महाजन, प्रेम रवींद्र चौधरी, सुनील एकनाथ राणे, अक्षय सुनील राणे, दीपक महाजन, भोजू टोंगळे, लीलाधर टोंगळे, किशोर धांडे, लिलाधार पाटील, भुवनेश्वर नारखेडे, गिरीश पाटील, हर्षल धांडे, खिलचंद धांडे, प्रदीप आदिवाले, प्रदीप मेढे, वासुदेव मेढे, गोविंदा मेढे, दिनकर पाटील, ज्ञानेश्वर लिधुरे, दीपक धांडे, आकाश धांडे, देविदास टोंगळे, कोमल धांडे, पुनम पंकज धांडे, तृणाली धांडे स्वप्निल धांडे, सौ उन्नती संजय चौधरी, ममता चौधरी, सिमा चौधरी, मोना फेगडे, दिपाली बडे, भावना राणे, पुनम नेहते, सविता ढोले, शारदा सिरामे यांच्यासह विवरा निंभोरा येथील नागरिक त्या त्या ठिकाणी निघालेल्या प्रचार रलीत सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.