धनंजय चौधरींच्या रॅलीला भालोदमध्ये अभूतपूर्व उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांनी विजयी करण्याचे दिले आश्वासन
धनंजय चौधरींच्या रॅलीला भालोदमध्ये अभूतपूर्व उत्स्फूर्त प्रतिसाद
मतदारांनी विजयी करण्याचे दिले आश्वासन
प्रतिनिधी रावेर -मी तर जनतेचा सेवेकरी असून सेवेचा वारसा मला वाडवडिलांकडून मिळाला आहे. जनतेच्या आशीर्वादाने मतदार संघाचा विकास हेच आपले ध्येय असेल असे आश्वासन महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे रावेर विधानसभा मतदार संघातील उमेदवार धनंजय चौधरी यांनी सोमवारी भालोद येथे प्रचारफेरी दरम्यान मतदारांशी संवाद साधतांना दिले. भालोद येथे चौधरींच्या प्रचार रॅलीला उदंड प्रतिसाद मिळाला. महिलांनी ठिकठिकाणी औक्षण केले. तर नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग संपूर्ण प्रचार दौऱ्याची लक्षवेधी ठरली. यावेळी प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आश्वासन नागरिकांनी चौधरी यांना दिले.
रावेर मतदार संघातील रावेर, भोर, खिरोदा प्र यावल,या अटरावल व भालोद या गावातील मतदारांशी प्रचार फेरीद्वारे उमेदवार धनंजय चौधरी यांनी संवाद साधला. रावेर मतदार संघात भरीव कामे करायची असून उदयोगक्षेत्र वाढले पाहिजे त्यासाठी भावीकाळात माझे प्रयत्न राहतील अशी ग्वाही कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी मतदारांशी बोलताना दिली. रावेर मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाचे आपले ध्येय आहे. यासाठी मला जनतेने सेवेची संधी द्यावी अशी विनंती उमेदवार धनंजय चौधरी यांनी मतदारांना केली आहे. भालोद येथील प्रचार फेरीत यावल तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, माजी सरपंच लिलाधर विश्वनाथ चौधरी, किशोर लक्ष्मण महाजन, नारायण चौधरी, नितीन वासुदेव चौधरी, मधुकर गिरधर परतणे, ग्रामपंचायत सदस्य अजय वामन कोळी, माजी ग्रामपंचायत सदस्य दगडू पठाण, शिवसेना उबाठा शाखाप्रमुख दिलीप नेहरकर, संपर्कप्रमुख चंद्रकांत चौधरी, समाधान भालेराव, आप्पा विसपुते तर अटरावल येथे प्रचार फेरीत यावल काँग्रेस कमेटी अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे, सत्कार विद्यामंदिर चेअरमन हेमंत एकनाथ चौधरी, माजी सरपंच भानुदास शंकर चौधरी, मुकेश चौधरी, तुषार शिंदे, यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संखेने उपस्थित होते.
आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा
महाविकास आघाडीचे धोरण सर्वसामान्यांना न्याय व सन्मान देणारे आहे. देशाचे संविधान बदलवू पाहणाऱ्या शक्तींच्या विरोधात महाविकास आघडीच्या नेत्यानी लढा सुरू केलेला आहे. या लढ्याला रावेर यावल तालुक्यातील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी साथ दिली आहे. रावेर मतदार संघातील महायुतीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या खिरोदा येथील निवासस्थानी रविवारी संध्याकाळी सुमारे ३०० कार्यकर्त्यांनी जावून हा पाठिंबा जाहीर केला आहे. संविधान बदलवू पाहणाऱ्यांना मतदार या निवडणुकीत योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. रावेर मतदार संघातील कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या भेट घेवून पाठिंबा देण्यासाठी आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते बाळू शिरतुरे(रावेर), प्रदीप सपकाळे(कुसुंबा), रोझोदा येथील किशोर मेढे, राजू मेढे, विनायक मेढे, वासुदेव मेढे, एम के तायडे(निंभोरा), धुमा तायडे(रावेर), सावन मेढे( रावेर), बामनोद येथील किरण केदारे, गोपाल भालेराव(बामनोद) यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील सुमारे ३०० स्त्रीपुरुष कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत