Header Ads

Header ADS

धनंजय चौधरींना विजयी करण्याचे मतदारांचे आश्वासन प्रचार दौऱ्यात मतदारांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग

 

Dhananjay-Chaudhary-Assured-Voters-Spontaneous-Participation-in-Campaign-Tour

धनंजय चौधरींना विजयी करण्याचे मतदारांचे आश्वासन प्रचार दौऱ्यात मतदारांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग  

लेवाजगत न्यूज प्रतिनिधी रावेर-विकासाचे व्हीजन असलेल्या कॉँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आश्वासन मतदारांनी उमेदवार धनंजय चौधरी यांना प्रचार दौऱ्यात दिले आहे. रावेर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांचा गुरुवारी रावेर तालुक्याच्या पूर्व भागात प्रचार दौरा होता. यावेळी प्रचार दौऱ्याला मतदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवार चौधरी यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले तर महिलांनी औक्षण करीत आशीर्वाद दिले. 

   रावेर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी रावेर तालुक्यातील कर्जोत, अहिरवाडी, निरुळ,पाडळे बुद्रुक, पाडळे खुर्द, मोहगण, पिंप्री , मंगरुळ, जुनोने , केऱ्हाळा खुर्द, केऱ्हाळा बुद्रुक, भोकरी या गावांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधला. मतदारांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचे यावेळी त्यांनी आश्वासन दिले. प्रचार फेरीत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. यावेळी सोपान पाटील, राजू सवरणे, नरेंद्र पाटील, लियाकत जमादार, योगेश पाटील, दिलरुबाब तडवी, निरुळ येथील गोपाल पाटील, समाधान खैरे, प्रकाश खैरे, साहेबराव खैरे, संदीप साइमिरे, रमेश पाटील, बाळकृष्ण पाटील, कर्जोत येथील शरद पाटील, मनोज पाठक, सतीश बढे, शेख शफी शेख रफीउद्दीन, राजू तडवी, वसीम तडवी, विजय ससाणे, काशीनाथ ससाणे, शे साजिद शे सत्तार, शेख बिस्मिल्ला पाडळे येथील गुलशार तडवी, आसिफ तडवी, अरमान तडवी, दगडू तायडे,मनोहर घेटे, मयूर महाजन, ईश्वर महाजन, रशीद तडवी, गणेश रायपुरे, छबू तडवी, जसाबई तडवी, अल्लाबक्ष तडवी मनोज तडवी, करीम तडवी, नथू तडवी, लतीफ तडवी अहिरवाडी येथील चेतन चौधरी, नितीन चौधरी, भास्कर वाघ, विशाल वाघ, कल्याण पाटील, अनवर तडवी, जितेंद्र वाघ, उदय वाघ, किशोर चौधरी, मुन्ना पाटील, लतीफ तडवी, मयूर सावळे, ईश्वर वाघ, सुभाष चौधरी, राहुल लाहसे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार मोठ्या संखेने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.