Header Ads

Header ADS

दौंड व इंदापूर विधानसभा मतदारसंघात ३३ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त


 दौंड व इंदापूर विधानसभा मतदारसंघात ३३ लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त


 लेवाजगत न्युज पुणे :- राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड विभागाअंतर्गत २ ऑक्टोबर २०२४ पासून दौंड आणि  इंदापूर विधानसभा मतदारसंघात विशेष मोहिम राबवून एकूण ३३ लाख ८९ हजार ८९१ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विजय रोकडे यांनी दिली आहे. 

 

मोहिमेदरम्यान केलेल्या कारवाईत एकूण ६१ गुन्हे नोंदविण्यात आले असून दरम्यान एकूण ५८ आरोर्पीना अटक करण्यात आली. अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या एकूण २ चारचाकी व ७ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीचा कारखाना दोन वेळा उद्धवस्त केला आहे. 


या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, मयूर गाडे, दिनेश ठाकूर, सहायक दुय्यम निरीक्षक सुवास पोळ, जवान अशोक पाटील, संकेत वाजे, प्रविण सूर्यवंशी, सौरभ देवकर, जवान-नि-वाहन चालक केशव वामने यांनी सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.