Header Ads

Header ADS

काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचारार्थ, महायुती सरकारचे काम महाराष्ट्र नव्हे गुजरातसाठी खासदार डॉ. नासीर हुसेन यांची रावेर येथे टीका

 

महायुती सरकारचे काम महाराष्ट्र नव्हे गुजरातसाठी खासदार डॉ. नासीर हुसेन यांची रावेर येथे टीका

काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचारार्थ,

महायुती सरकारचे काम महाराष्ट्र नव्हे गुजरातसाठी खासदार डॉ. नासीर हुसेन यांची रावेर येथे टीका

लेवाजगत न्यूज रावेर-भाजपने सत्तेच्या हव्यासापोटी पक्ष फोडून महाविकास आघाडीचे सरकार पाडले. पण, महायुतीच्या या सरकारची कामगिरी शून्य आहे. त्यांनी राज्यातील जनतेचा अपमान केला. महायुतीचे सरकार महाराष्ट्राच्या जनतेसाठी नव्हे तर गुजरातसाठी काम करीत असल्याची टीका खासदार डॉ. नासीर हुसेन यांनी केली.

     रावेर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांच्या प्रचारार्थ रावेर येथील शौकत मैदानावर मंगळवारी जाहीर सभा झाली. व्यासपीठावर आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, अली अंजुम रिझवी, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, गोटू महाजन, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, सुनील कोंडे, अब्दुल समद, अब्दुल मुतल्लीब, युसूफ खान, गयास शेख, गयास काझी, अब्दुल रफिक, सादिक शेख, महेमूद शेख, गोंडू महाजन, जावेद जनाब, इस्माईल पहिलवान, रशीद खाटिक, इम्रान शेख, योगेश गजरे, विनायक महाजन, अयूब मेंबर, असदुल्ला खान यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. अली अंजुम रिझवी, अब्दुल मुतल्लीब यांनी सभेला संबोधित केले.

      सत्तेसाठी विशिष्ट समाजातील लोकांना हाताशी धरून फूट पाडण्याचा प्रयत्न काही व्यक्तींकडून सुरु आहे. या समाजातील व्यक्तीचा वापर करून भाजपचा उमेदवार निवडून आणण्याचा हा डाव मुस्लीम समाजाने उधळून लावावा. काँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांना निवडून द्यावे असे आवाहन अली अंजुम रिझवी यांनी केले. अपक्ष उमेदवार व माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद यांच्या नगराध्यक्ष पदाच्या काळात आमदार शिरीष चौधरी यांनी शहराच्या विकासासाठी मोठा निधी मिळवून दिला आहे. पण, आता हे उमेदवार आमदारांनी काय दिले? असे विचारत आहेत. यावर माजी नगरसेवक अब्दुल मुतल्लीब यांनी टीका केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.