सोशल मीडिया वर आचारसंहिता भंग होईल अशी पोस्ट केल्यास ऍडमिन वर करणार कारवाई:- सपोनि विशाल पाटील
सोशल मीडिया वर आचारसंहिता भंग होईल अशी पोस्ट केल्यास ऍडमिन वर करणार कारवाई:- सपोनि विशाल पाटील
लेवाजगत न्युज सावदा:-सावदा पोलीस स्टेशन तर्फे विशाल पुं. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सावदा पोलीस स्टेशन यांचे आवाहन आपण सदर व्हॉटस्अप गृप चे अडमीन आहात. आपण आपल्या व्हॉटस्अप गृप मध्ये कोणकोणत्या व्यक्तींना समाविष्ट करू शकता याबाबत आपणास सर्व अधिकार असुन सदर व्हॉटस् अॅप गृप मध्ये कोणकोणते संदेश येतात किंवा पाठविले जातात याबाबत आपणास पुर्ण कल्पना आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अनुषंगाने दिनांक १८/११/२०२४ रोजी प्रचाराची मुदत संपलेली असुन प्रचाराची मुदत संपल्यानंतर विधानसभा संघामध्ये ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, असे उमेदवार त्यांचे कार्यकर्ते तसेच सामान्य नागरीक यांनी फेसबुक, युट्युब, व्हॉटस् अॅप, इन्स्टाग्राम इत्यादी सोशल मिडीया माध्यमातुन प्रचार प्रसिध्दीची मुदत समाप्तीनंतर शांतता कालावधी मधे स्टेटस, पोस्ट, शेअरिंग याव्दारे प्रचार करण्यात येवु नये,
याबाबत आपले व्हॉटस् अॅप गृपमधील सदस्यांना पुर्ण सुचना देण्यात याव्यात. आपण आपले गृपचे सेटींग मधे बदल करून ONLY FOR ADMIN अशी सेटींग करावी. आपले व्हॉटस् अॅप गृपमध्ये प्रचाराची कोणतीही पोस्टे झाल्यास व आपण सदर गृपचे अॅडमीन असल्याचे आमच्या निदर्शनास आल्यास सदर पोस्टे मुळे आदर्श आचार संहितेता भंग अगर कायदा व सुव्यावस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ज्या व्यक्तीने सदरची पोस्ट केली आहे,
त्या व्यक्तीस व आपण गृप अॅडमीन असल्याने आपणास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल व आपणा विरूध्द प्रचलीत कायद्या नुसार कायदेशिर कारवाई करण्यात येईल तसेच सदर नोटीसचा आपले विरूध्द मा. न्यायालयात पुरावा म्हणुन वापर केला जाईल याची नोंद घ्यावी.
असे आव्हान्स हवना पोलीस स्टेशन तर्फे विशाल पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी केलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत