Header Ads

Header ADS

28 वर्षीय तरुणाची घरात गळफास घेऊन आत्महत्या


 28 वर्षीय तरुणाची घरात गळफास घेऊन आत्महत्या


लेवाजगत न्युज पहूर:- शेतातील उपटलेली कपाशी पेटविण्यासाठी पेट्रोल आणण्याासाठी गेलेल्या २८ वर्षीय लहान भावाने राहत्या घरात गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याने मोठ्याभावाने एकच आक्रोश केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता समोर आली आहे. 


आत्महत्या करण्याचे कारण समोर आली आहे. (गोकुळ दिलीप सोनार वय २८ रा. पहूर ता. जामनेर) असे मयत तरूणाचे नाव आहे.


अधिक माहिती अशी की, गोकुळ सोनार हा आई व मोठा भाऊ यांच्या सोबत वास्तव्याला होता. 


शेती करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. शुक्रवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांची आई व मोठा भाऊ गजानन यांच्यासोबत शेतात कामासाठी गेला होता. शेतातील कपाशी उपटलेली ओली असल्याने ती पेटविण्यासाठी पेट्रोल आणण्यासाठी गोकुळ सोनार हा शेतातून गावाकडे गेला. त्यानंतर तो परतला नाही. त्याला उशीर होत आल्याचे पाहून त्याचा मोठा भाऊ गजानन याने गावातील शेजारी राहणाऱ्यांना फोन लावला. त्यावेळी त्यानी घरी जावून पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. ही घटना त्याच्या आई व मोठ्या भावाला समजल्यानंतर त्यांनी तातडीने घरी धाव घेतली.


 भावाने गळफास घेतल्याचे पाहून मोठ्या भावासह त्याची आईने एकच आक्रोश केला होता. यावेळी त्याला खाली उतरवून पहूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.


 आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार भरत लिंगायत पुढील तपास करीत आहेत.


लहानपणीच पितृछत्र हरपलेल्या गोकुळला आईने व मोठ्या भावाने चांगले शिक्षण दिले. गोकुळ शेतीसह शेततळ्यांची कामे करीत असे, त्याने दहा-बारा तरुणांना शेततळ्यांच्या कामात रोजगार उपलब्ध करून दिला होता. मनमिळाऊ स्वभाव असलेल्या गोकुळच्या अकाली जाण्याने शिवनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.