२२ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा औत हाकताना हृदयविकाराने मृत्यू
२२ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा औत हाकताना हृदयविकाराने मृत्यू
लेवाजगत न्युज दहिगाव-मोहराळा (ता.यावल) :- येथील २२ वर्षीय तरुणाचा शेतात औत हाकताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना १२ नोव्हेंबरला सकाळी घडली. मोहराळे येथील चेतन संजय पाटील हा तरुण मंगळवारी मोहराळे शिवारातील भीमा अडकमोल यांच्या शेतात मका लागवडीसाठी सऱ्या पाडण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत एक मजूर देखील होता. औत हाकत असताना सकाळी ११ वाजेच्या सुमारास चेतन अचानक चक्कर येऊन खाली पडला. यामुळे शेतमालक अडकमोल व सोबतच्या मजुराने चेतनच्या कुटुंबीयांना माहिती दिली. यानंतर त्याला यावल येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
तेथे प्राथमिक उपचार करून त्याला भुसावळ येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. पण, तिथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. चेतन हा संजय पाटील यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. सायंकाळी शोकाकुल वातावरणात चेतनवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत