भारतीय रेल्वे भरती बोर्डात रिक्त पदे
भारतीय रेल्वे भरती बोर्डात रिक्त पदे
लेवाजगत न्यून मुंबई-भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती बोर्ड्स (सेंट्रलाईज्ड एम्प्लॉयमेंट नोटीस (CEN) क्र. ०६/२०२४ दि. २० सप्टेंबर २०२४) अंडर ग्रॅज्युएट उमेदवारांची नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) च्या एकूण ३,४४५ पदांची २१ रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड्समध्ये भरती. (RRB मुंबई - एकूण ६९९, RRB अहमदाबाद - एकूण २१०) रिक्त पदांचा तपशील -
(१) कमर्शियल कम टिकेट क्लर्क - एकूण २,०२२ (RRB मुंबईमधील एकूण - ४९७ पदे - CR - ३७२, SCR - २१, WR - १०४) (RRB अहमदाबाद WR - १५५).
(२) अकाऊंट्स क्लर्क कम टायपिस्ट - एकूण ३६१ (RRB मुंबई एकूण ४५ पदे - CR - ३६, WR - ९).
(३) ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट - एकूण ९९० (RRB मुंबई एकूण १४७ पदे - CR - १०२, SCR - २, WR - ४३) (RRB अहमदाबाद WR - ४६).
(४) ट्रेन्स क्लर्क - एकूण ७२ (RRB मुंबई एकूण १० पदे - CR - ८, WR - २) (RRB अहमदाबाद WR - ७).
एकूण पदांपैकी १० पदे माजी सैनिकांसाठी व ७ पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव.
पात्रता : (दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी) सर्व पदांसाठी (१२ वी किमान ५० गुणांसह) उत्तीर्ण. पद क्र. २ अकाऊंट्स क्लर्क कम टायपिस्ट आणि पद क्र. ३ ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट पदांसाठी संगणकावरील हिंदी/इंग्लिश टायपिंग प्रोफिशियन्सी अनिवार्य आहे.
वयोमर्यादा : (दि. १ जानेवारी २०२५ रोजी) १८ ते ३३ वर्षे (UR EWS उमेदवारांचा जन्म दि. १ जानेवारी २००७ ते २ जानेवारी १९९२ दरम्यानचा असावा.)
अनआरक्षित पदांसाठी अजा/अज/इमावच्या उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळणार नाही.
वेतन श्रेणी : पद क्र. १ साठी पे-लेव्हल - ३ (रु. २१,७००/-) अंदाजे वेतन दरमहा रु. ४३,८००/-; पद क्र. २ ते ३ साठी पे-लेव्हल - २ (रु. १९,९००) अंदाजे वेतन दरमहा रु. ३७,०००/-.
निवड पद्धती : स्टेज-१ - कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) (सर्व पदांसाठी सामायिक) जनरल अवेअरनेस - ४० प्रश्न, मॅथेमॅटिक्स - ३० प्रश्न, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग - ३० प्रश्न, एकूण १०० प्रश्न, प्रत्येक प्रश्नास १ गुण असे एकूण १०० गुण, वेळ ९० मिनिटे. चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील. CBT मधील नॉर्मलाईज्ड केलेल्या गुणवत्तेनुसार उमेदवार स्टेज-२ CBT साठी निवडले जातील. (अंदाजे रिक्त पदांच्या १५ पट)
स्टेज-२ - (i) CBT - जनरल अवेअरनेस - ५० प्रश्न, मॅथेमॅटिक्स - ३५ प्रश्न, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग - ३५ प्रश्न, एकूण १२० प्रश्न. प्रत्येक प्रश्नास १ गुण, एकूण १२० गुण, वेळ ९० मिनिटे. चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील.
(ii) टायपिंग स्किल टेस्ट (TST) - ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट आणि अकाऊंट्स क्लर्क कम टायपिस्ट पदांसाठी उमेदवारांना टायपिंग स्किल टेस्ट (TST) द्यावी लागेल. (TST मधील गुण गुणवत्ता यादीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.)
स्टेज-२ - CBT मधील गुणवत्तेनुसार TST साठी रिक्त पदांच्या ८ पट उमेदवार (कॅटेगरीनुसार) बोलाविले जातील. यात उमेदवारांनी कॉम्प्युटरवर ३० श.प्र.मि. वेगाने इंग्लिश टायपिंग किंवा २५ श.प्र.मि. वेगाने हिंदी टायपिंग करावयाचे आहे.
(iii) कागदपत्र पडताळणी (DV) आणि वैद्याकीय तपासणी
अर्ज कसा करावा : उमेदवार फक्त एका RRB साठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी आपली पदांसाठी पात्रता पाहून पदनिहाय आणि रेल्वे (जसे की RRB मुंबईसाठी CR, SCR, WR) निहाय पदांचा पसंतीक्रम अर्जात नोंदवायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पुढील कागदपत्रे JPEG फॉरमॅटमध्ये स्कॅन करून तयार ठेवावीत.
(१) हलक्या/पांढऱ्या बॅकग्राऊंडमधील पासपोर्ट आकाराचा (३.५X४.५ सें.मी.) रंगीत फोटोग्राफ (२०-५० KB) (२) सिग्नेचर - काळ्या शाईच्या पेनाने केलेली स्वाक्षरी (५X २ सें.मी.) (१० - ४० KB) (३) अजा/अज जातीचे दाखले (५० - १०० KB)
ऑनलाइन अर्जात काही सुधारणा करावयाची असल्यास Modification Window दि. २३ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२४ दरम्यान उपलब्ध असेल. (यासाठी रु. २५०/- फी भरावी लागेल.)
CBTs; TST साठीचे हॉल तिकीट (e- call letter) RRB च्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केले जातील. उमेदवारांना ई-मेल आणि एसएमएस द्वारे तसे सूचित केले जाईल.
परीक्षा शुल्क : (१) रु. ५००/- (जे उमेदवार स्टेज-१ सीबीटीला बसतील, त्यांना रु. ४००/- बँकींग चार्जेस वगळता परत केले जातील.) (२) अजा/अज/माजी सैनिक/ दिव्यांग/ महिला/ ट्रान्सजेंडर/ अल्पसंख्यांक/ आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग (ईबीटी) यांना रु. २५०/- (जे उमेदवार स्टेज-१ सीबीटीला बसतील त्यांना रु. २५०/- बँकींग चार्जेस वगळता परत केले जातील.) भरलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा मिळविण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात आपल्या बॅंकेचे नाव, खातेधारकाचे नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड भरावयाचे आहे. ऑनलाइन परीक्षा शुल्क २१, २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत भरता येईल.
मुंबई RRB मधील पदांसाठी www. rrbmumbai. gov. in या संकेतस्थळावर दि. २० ऑक्टोबर २०२४ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत. (RRB मुंबईचा फोन नंबर आहे ०२२-६७६४४०३३).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत